दरवर्षीप्रमाणे दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मित्र देशाचे राष्ट्रध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे कारण भारतानं इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनादेखील या प्रजासत्ताक दिनीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे. २६ जानेवारी १९५० मध्ये भारतानं आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला होता त्यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर ६८ वर्षांनी पुन्हा एकदा इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

दिल्लीत आलेल्या या विमानाचे पायलट होते ब्रूनेईचे गर्भश्रीमंत सुलतान

भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करतो. भारतानं यापूर्वी कधीही दोनपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित केलं नाही, पण यावेळी मात्र भारतानं आयसिन देशांच्या इतरही नऊ राष्ट्राध्यक्षांना भारतात आमंत्रित केलं आहे. यामध्ये म्यानमारच्या आंग सान सू ची, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष ली सीन लूंग, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष गुयेन जुआन फूक, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष नजीब रजक, थायलंडचे राष्ट्राध्यक्ष चान ओ चा, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डूटर्ट, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष हुन सेन, ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्कियाह, लाओसचे राष्ट्राध्यक्ष थोनगलोउन सिसोउलिथ यांचा समावेश आहे. या प्रमुख पाहुण्यांचे बुधवारी रात्रीपासून भारतात आगमन झाले आहे.