22 September 2020

News Flash

इन्स्टाग्रामवर कोण आलंय पाहा!

एकता कपूरच्या आग्रहाखातर स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर

( छाया सौजन्य : smritiiraniofficial)

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या ट्विटवर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियाचे महत्त्व आणि त्याचा पुरेपुर वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलच ठाऊक आहे. पण ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या स्मृती आता चक्क इन्स्टाग्रामवरही पाहायला मिळाल्या. कालच स्मृती इराणींनी इन्स्टाग्रामवर आपला पहिला वहिला फोटो शेअर केला. ‘आता इन्स्टावर कोण आलंय पाहा’ असे लिहित स्मृती यांनी आपला तरूणपणीचा फोटो शेअर केला आहे. एरव्ही फेसबुक किंवा ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रीय असणारी नेतेमंडळी इन्स्टावर क्वचितच पाहायला मिळतात. पण स्मृती इराणींनी मात्र इथे सगळ्यात आधी बाजी मारली आहे. इन्स्टावर आल्या आल्या बारा तासांच्या आतच सात हजारांहून अधिक लोकांनी त्यांना फॉलो करायला सुरूवात देखील केली आहे.

एकता कपूरने मला इन्स्टाग्राम अकाऊंट उघडण्यास प्रोत्साहित केले, आता पुढचा प्रवास फारच मजेशीर असेल, असे लिहित स्मृती यांनी एकता सोबतही आपला फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे आपल्या विनंतीस मान देऊन स्मृती इन्स्टाग्रामवर आल्या हे पाहून एकता कपूरनेही त्यांचा एक फोटो शेअर करत स्वागत केले.

काही दिवांपूर्वी कतरिना कैफने देखील इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट सुरू केले होते. एरव्ही सोशल मीडियापासून दूर राहणारी कतरिनाही आता इन्स्टावर बऱ्यापैकी सक्रीय झाली आहे. सलमान खानपासून ते शाहरुख खान, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा या सगळ्यांनीच तिचे स्वागत केले होते.

View this post on Instagram

Guess who's on Insta now 😋#tbt #goodolddays

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 10:53 am

Web Title: smriti irani joins instagram
Next Stories
1 भगवान महादेवाकडं काय मागितलं विचारणाऱ्या युजरला मोदींचं हटके उत्तर
2 Viral Video : हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल!
3 … आणि मॅचनंतर प्रेक्षकांनी झाडून साफ केलं स्टेडियम
Just Now!
X