News Flash

स्मृती इराणींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला तो फोटो

'...जिला आपल्याला कधीच गमवावेसे वाटणार नाही'

. 'आयुष्यातली अशी स्पेशल व्यक्ती जिला आपल्याला कधीच गमवावेसे वाटणार नाही'

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या ट्विटवर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियाचे महत्त्व आणि त्याचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलच ठाऊक आहे. ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या स्मृती इन्स्टाग्रामवरही बऱ्यापैकी सक्रीय असतात. नुकताच स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती झुबिन यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केलाय. खरं तर झुबिन यांनी हा फोटो आधी इन्स्टावर शेअर केला होता. तो स्मृती इराणी यांनी रिपोस्ट केलाय. ‘आयुष्यातली अशी स्पेशल व्यक्ती जिला आपल्याला कधीच गमवावेसे वाटणार नाही’ असंही स्मृतीनी लिहिलं आहे.

स्मृती इराणी जेव्हा एकता कपूरच्या ‘क्यों की सांस भी कभी…’ या मालिकेत काम करत होत्या तेव्हाचा हा फोटो आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या काळातला हा फोटो असून, यावर एकता कपूरने देखील कमेंट केली आहे. या दोघांनाही तिने शुभेच्छा दिल्यात. अनेकदा स्मृती इराणी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर जुने फोटो शेअर करतात. मे महिन्यातच स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले होते. त्यावेळी देखील स्मृती इराणी यांनी आपला तरूणपणीचा फोटो शेअर केला होता. एकता कपूरच्या आग्रहाखातर त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 6:19 pm

Web Title: smriti irani share photo of her husband zubin on her instagram account
टॅग : Smriti Irani
Next Stories
1 Viral Video : नोकरी गेली तर इस्लाम धर्म स्वीकारण्याची शिक्षण सेवकांची सरकारला धमकी
2 आणि एवढा मासा खाणे त्यांना पडले महागात
3 डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेलं चित्र पाहिलंत का?
Just Now!
X