राजकारणाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असणाऱ्या मंत्र्यांपैकी एक नाव म्हणजे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी. स्मृती यांनी नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. अर्थात हा फोटो त्या शेअर करत असणाऱ्या अनेक फोटोंपैकीच आहे. मात्र या फोटोबद्दलची खास गोष्ट म्हणजे त्यावर मिळत असणाऱ्या प्रतिक्रिया. या फोटोवर अनेक लोकं मजेदार प्रतिक्रिया देत असतात. मात्र आता थेट सेलिब्रिटींनीही या फोटोवर कमेंट करण्यास सुरुवात केलीय. अभिनेता सोनू सूद आणि दिग्दर्शक एकता कपूर यांनी स्मृती यांच्या फोटोवर कमेंट्स केल्यात.
स्मृती यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या मास्क घालून गाडीत बसून काम करताना दिसत आहेत. स्मृती गाडीच्या खिडकीच्या बाजूच्या सीटवर बसून मांडीवर ठेवलेल्या कागदांवर काहीतरी लिहित आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये, “कोण म्हणतं की होमवर्क फक्त शाळेत असतो. पढ़ती का नाम प्यारी. इसी में चली गई आधी उम्र हमारी,” असं म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी या पोस्टमध्ये अगदी मजेदारपद्धतीने आपल्या वयासंदर्भातही स्पष्टीकरण दिलं आहे. “अर्धीचा अर्थ मी अजून ५० वर्षांची झालेले नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
स्मृती यांच्या या फोटोवर सोनू सूदनेही कमेंट केलीय. स्मृती यांच्याप्रमाणे सोनू सुद्धा सोशल नेटवर्किंगवर बराच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांना उत्तर देण्यापासून ते इतरही अनेक गोष्टी सोशल नेटवर्किंगवर शेअर करतो. तो अनेक कलाकारांच्या पोस्टवरही कमेंट करतो. अशीच मजेदार कमेंट त्याने केलीय. सोनूने स्मृती यांच्या फोटोवर कमेंट करत, ‘पढ़ेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया,’ असं म्हटलं आहे. तर एकता कपूर यांनी, “तुम्ही खूपच बारीक दिसत आहात,” अशी कमेंट केलीय.
काही दिवसांपूर्वी सुद्धा स्मृती यांनी घरासमोरील अंगणामधून ऑनलाइन माध्यमातून मिटींगमध्ये सहभागी झालेला स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर एका युझरने स्मृती यांनी हवाई चप्पल घातल्याचं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना स्मृती यांनी, “अरे २०० रुपयांवाली हवाई चप्पल आहे, आता ब्रॅण्ड विचारु नका फक्त,” असं म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 1:22 pm