18 September 2020

News Flash

‘या’ चष्म्यात होते व्हिडिओ रेकॉर्डिंग

हा चष्मा घालून तुम्ही जिथे जाल तिथले दृश्य या कॅमेरात कैद होईल

( छाया सौजन्य - Snap Inc.)

डोळ्यावर असलेल्या सनग्लासेसमध्ये जर समोरचे सुंदर दृश्ये साठवता आले तर ? तुम्ही म्हणाल सनग्लासेस आणि या वाक्याचा काहीच संबध नाही, एखादवेळी सनग्लासेसच्या ऐवजी तिथे ‘डोळे’ हा शब्द वापरला असता तर योग्य असते. मग हा चूकीचा प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे ? पण हिच तर खरी गंमत आहे. कारण आता बाजारात असे सनग्लासेस येणार आहेत की त्यांच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.
कॅलिफोर्नीयामधल्या ‘स्नॅपचॅट’ ही कंपनीने कॅमेरा असलेले सनग्लासेस बाजारात आणणार आहे. ‘स्पेक्टॅकल’ असे या सनग्लासेसचे नाव असून यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे शक्य होणार आहे. गेल्या काहि वर्षांपासून हि कंपनी काही तरी नवे बनवू पाहत होती आता या कंपनीला यश आले आहे. ‘स्पेक्टॅकल’ हे सनग्लासेस असून त्यामुळे छोटा कॅमेरा बसवण्यात आला आहे. हा जगातील सगळ्यात छोटा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे हे सनग्लासेस घालून तुम्ही जिथे  जाल तिथले दृश्य या कॅमेरात रेकॉर्ड होईल. चष्म्याच्या फ्रेमवर कलात्मकरित्या कॅमेरा बसवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी स्नॅपचॅट कंपनीकडून हा सनग्लासेस कसा असले याबद्दल थोडी फार माहिती देण्यात आली. यावर सध्यातरी काम सुरू आहे. साधरण एका दिवसांपर्यंत या कॅमेराची बॅटरी चालेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच जर हे सनग्लासेस वापरून एखादा व्हिडिओ घेण्याच्या प्रयत्न करत असेल तर समोरच्या व्यक्तीला याचे सिग्नल मिळतील असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 2:34 pm

Web Title: snapchat launches video recording sunglasses
Next Stories
1 थाटामाटात पार पडला सिंहाचा लग्नसोहळा
2 मिशेल यांनी माजी राष्ट्राध्यक्षांना दिली ‘जादू की झप्पी’, सोशल साइटवर फोटो झाला व्हायरल
3 हे आहे देशातील सुंदर हस्ताक्षर
Just Now!
X