जगभरात करोना व्हायरपासून वाचण्यासाठी विवध प्रयत्न केले जात आहे. काही ठिकाणी लागण झालेल्या लोकांना धीर देण्यासाठी काही उपाय केले जात आहेत. तर काही ठिकाणी या व्हायरपासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.

गुरूग्राम येथील एका सोसायटीमध्ये तेथील रहिवासी गायत्री मंत्राचा जप करत आहेत आणि त्यांच्या बाल्कनीमधून हम होंगे कामयाब हे गाणे गात आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना घरातच राहण्यास भाग पाडले आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल आयसोलेशन करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे नागरिक आपल्या घरात थांबून आहेत. मात्र त्याचमुळे त्यांचा उत्साह कमी झालेला नाही हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.


गुरुग्रामच्या एका सोसायटीमधला हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सोसायटीमधील अनेक रहिवासी ठरलेल्या वेळेस त्यांच्या बाल्कनीत आले आणि त्यांच्या घरातून ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

गुरुग्राममधील तीन व्यक्तींनी करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे तेथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाइटक्लब आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.