06 March 2021

News Flash

“हा तर माझ्यासाठी सोशल मीडियावरील नवा सुपरस्टार”; गांगुलीच्या पसंतीला चाहत्यांचाही पाठिंबा

आयपीएलसंदर्भात गांगुलीने दिली प्रतिक्रिया

फाइल फोटो (फोटो सौजन्य: एपी)

भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी असणारा भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली सध्या इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) आयोजनासंदर्भातील कामात व्यस्त असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत होते. अनेकदा गांगुली सामान्यासाठी उपस्थित असल्याचेही दिसले. नुकताच तो दुबईवरुन लंडनला रवाना झाल्याचे वृत्तही समोर आले. मात्र या सर्व गोंधळामध्येही गांगुल सोशल नेटवर्किंगवर चांगलाच अॅक्टीव्ह आहे. गांगुलीने त्याचा माजी सहकारी आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज विरेंद्र सेहवागच्या एका पोस्टवर मजेदार कमेंट केली आहे. तसा सेहवाग यंदाच्या आयपीएलमध्ये समालोचक म्हणून काम करत नाहीय. मात्र तो सर्व सामने आवर्जून पाहतो आणि त्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. सध्या त्याने सोशल मीडियावर विरु की बैठक नावाने क्रिकेटवर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा एक मजेदार कार्यक्रम सुरु केला आहे.

आयपीएलच्या प्रत्येक सामन्याच्या दिवशी सेहवाग सोशल मीडियावरुन विरु की बैठकच्या माध्यमातून मालिकेमध्ये सध्या काय सुरु आहे यासंदर्भातील माहिती विनोदी पद्धतीने देत असतो. रविवारी ज्या दिवशी आयपीएलचे दोन सामने पार पडले त्या दिवशी म्हणजेच ४ ऑक्टोबरलाही सेहवागने असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. याच व्हिडीओवर सेहवागचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष असणाऱ्या सौरभ गांगुलीने कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

Double Dhamaaka Sunday. Catch the fresh episode of ‘Viru Ki Baithak’ every morning only on Facebook Watch #CricketTogether

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

सौरभने सेहवागचा उल्लेख ‘सोशल मीडियावरील नवा सुपरस्टार’ असा केला आहे. सेहवाग आणि सौरभच्या अनेक चाहत्यांनी या कमेंटवर रिप्लाय करत आपण दादाच्या म्हणण्याशी सहत असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी या कमेंटवर रिप्लाय देताना तुम्ही दोघेही ग्रेट असल्याचेही म्हटले आहे.


प्रत्येक सामन्यानंतरही विरु त्याच्या खासपद्धतीने ट्विटरवरुन मजेदार कमेंट करुन आपले मत मांडत असतो. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर विरु सोशल मीडियावरुन चांगलाच लोकप्रिय झाला असून तो या माध्यमातून चाहत्यांशी कॉनटॅक्टमध्ये असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:45 pm

Web Title: sourav ganguly reveals his new social media superstar netizens agree with bcci president scsg 91
Next Stories
1 Video : धोनीची दांडी गुल करणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो…
2 IPL 2020 : …म्हणून केदार जाधवला जाडेजा-ब्राव्होआधी फलंदाजीसाठी पाठवलं – स्टिफन फ्लेमिंग
3 IPL 2020 : CSK ने हातातला सामना गमावल्यावर धोनी म्हणतो, फलंदाजांनी निराश केलं !
Just Now!
X