News Flash

एका चिकन नगेटचा अंतराळ प्रवास!

पृथ्वीपासून १,१०,००० फुट उंचीवर अंतराळात पोहचलं होतं.

आइसलँडकडून सुपरमार्केटच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अंतराळात त्यांचा अतिशय लोकप्रिय असा पदार्थ पाठवण्यात आला होता. जे की एक चिकन नगेट होतं. या चिकन नगेटने पृथ्वीपासून १,१०,००० फुट उंचीवर अंतराळात स्ट्राटोस्फेरिक सेलचा आनंद घेतला.

पृथ्वीपासून १,१०,००० फुट उंचीवर अंतराळात पोहचण्यासाठी चिकन नगेटला १ तास ४५ मिनिटं लागली.या लकी ठरलेल्या नगेटने करडं आकाश मागे सोडलं. याचबरोबर कोविड-१९ चं संकट, ब्रेक्सिट आणि पायर्स मॉर्गनही. ट्रायफॉस्फियर ते स्ट्रॅटोस्फीयर असं सोडण्यात आलेल्या या नगेटने अविस्मरणीय शांतता, मोकळं आकाश, अंतरिक्ष यान आणि जगातील सर्वात उंचावर उडणाऱ्या पक्षांना देखील पाहिलं असणार. इतकेच काय, तर गोठवणाऱ्या थंड वातावरणात देखील स्टॅटरोस्फीअरमध्ये त्याला घरातच असल्यासारखं वाटलं असले.

एवढ्या उंचीवर पोहचलेलं चिकन नगेट पुन्हा जमिमनीकडे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने जमिनीकडे झेपावलं. जोपर्यंत जमिनीपासून १९ किलोमीटर वर त्याचं पॅराशूट उघडलं जात नाही व ते सुरक्षितरित्या उतरत नाही.

डीझीडमधील आईसलँडच्या मुख्य कार्यालयाच्या जवळच्या ठिकाणाहून हे नगेट स्ट्रॅटोस्फीयरद्वारे अंतराळात सोडण्यात आले. सुपरमार्केटने मोठ्या टप्प्या गाठल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 10:51 pm

Web Title: space travel of a chicken nugget msr 87
Next Stories
1 अन् त्याने आकाशातील त्या गूढ ताऱ्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना बोलावलं
2 ‘योग’ होता हत्तीवरुन पडण्याचा! रामदेवबाबांचा व्हिडीओ व्हायरल
3 पक्षी की बोकड? तुम्हाला काय दिसतंय?; शबाना आझमींचं ट्विट बघाच
Just Now!
X