एका स्पॅनिश वायनरीत तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे ५० हजार लिटर वाइन ओसंडून वाहून गेली. यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. स्पेनच्या व्हॅलामेलिआ या ठिकाणी असलेल्या बोडगेजेस विट्टविनोस वायनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर ५० लिटर वाइनचे पाट वाहिले.

ही दृश्यं पाहताना आपल्याला दिसून येतं आहे की तांत्रिक बिघाड झाल्याने वायनरीमधून वाईनचे अक्षरशः पाट वाहिले. मोठ्या प्रमाणावर वाईन वाहून जमिनीवर आली. ५० हजार लिटर वाइन या तांत्रिक बिघाडामुळे वाया गेली. स्पेनमधली ही वायनरी १९६९ मध्ये सुरु करण्यात आली. १५७० हेक्टर जागेवर ही वायनरी आहे. जेव्हा इतक्या जुन्या वायनरीत बिघाड झाला तेव्हा सगळीकडे वाईनच वाईन असं दृश्य दिसून आलं. यासंबंधीचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी यासंबंधी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या घटनेत जे नुकसान झालं त्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.