‘स्पोर्टस् शूज’ निर्मितीतील अग्रगण्य कंपनी अदिदास ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याबद्दल व्यवस्थापनाने पाच हजार बुटांचे जोड मोफत वाटण्यास सुरुवात केल्याची ‘पोस्ट’ सध्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर प्रसारित केली जात आहे. परंतु मोफत ‘शूज’ मिळविण्यासाठी नमूद केलेल्या अटी हा एक भूलभुलैय्याच आहे. व्हॉटस्अ‍ॅपवरील १४ जणांना ‘मोफत शूज’विषयी माहिती पाठवा, असे सांगणारा संदेशच अनेकांना चकवा देतो. ‘अदिदास’शी संबंधित तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ‘पात्र’ ठरविले जाते. मात्र त्यानंतर ‘शूज’चा नंबर निवडण्यासाठीच्या ‘बॉक्स’वर क्लिक केल्यानंतर पुन्हा १४ जणांना संदेश पाठविण्याची सूचना केली जाते. यातूनच माहितीची चोरी केली जाते. तेव्हा अशा संदेशांपासून सावध!