बरेलीमधील दोन उच्चशिक्षित तरूणांनी पिझ्झा आणि इतर खाद्यापदार्थाप्रमाणे चहाची होम डिलिव्हरी सुरू करत स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या स्टार्टअपचा मोठा विस्तार झाला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही तरूणांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून ते चांगल्या कंपनीमध्ये नोकरीलाही होते. आजघडीला हजारो लोक दररोज कार्यालय आणि कामाच्या ठिकाणी अथवा घरी त्यांच्या चहाचा आनंद घेत आहेत. अल्पावधीतच त्यांच्या या स्टार्टअपने कोट्यवधींचे उड्डाण घेतले आहे.

अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा अशी दोन उच्चशिक्षित तरूणांची नावं आहेत. या दोघांनी मिळून ‘चाय कॉलिंग’ नावानं चहाची होम डिलीव्हरी सुरू केली. अल्पावधीतच त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विविध शहरात आणखी १५ शाखा उघडल्या. यामधून सध्या त्यांना वर्षाला दोन कोटी रूपये मिळतात.

अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा यांनी लखनऊमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. दोघेही मोठ्या कंपनीमध्ये बक्कळ पगारावर काम करत होते. काम करत असताना आपला व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार असायचा. त्यादरम्यानच ऑफिसमधील मशीनचा चहा पिऊन आंबल्यानंतर (चवीनंतर) त्यांच्या डोक्यात ‘चाय कॉलिंग’ स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना आली. २०१४ मध्ये नोयडा सेक्टर १६ मध्ये स्टेशनजवळ दोघांनी ‘चाय कॉलिंग’ नावानं चहाचा स्टॉल सुरू केला. आज त्यांच्या ‘चाय कॉलिंग’ स्टॉलच्या १५ शाखा आहेत. चाय कॉलिंगने अनेक बेरोजगार तरूणांना नोकरी दिली आहे. व्यावसाय वाढल्यानंतर त्यांनी चहाच्या गुणवत्तेबरोबच फक्त १५ ते २० मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्यावर भर दिला. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम राहिला. सध्या वर्षाला त्यांची २०० लाख रूपयांची कमाई आहे.

‘ऑफिसमध्ये काम करताना मशीनमधील चहा पियाचो, मशीनमधील चहा पिऊन आंबल्यानंतर आम्ही ऑफिसबाहेरील टपरीवर चहा पियायला जाऊ लगलो. त्यांनी प्रमित आणि दोघांनी मिळून लाख रूपयांची गुंतवणुक करून चाय कॉलिंग नावाची वेबसाईट सुरू केली. व्यावसाय वाढल्यानंतर अनेक ऑफिसमधून ऑर्डर मिळयला लागली. एक कप चहाची किंमत दहा ते १५ रूपये आहे. ‘ असे अभिनवने सांगितले.

नोयडामध्ये तीन, बरेलीमध्ये सहा स्टॉल सुरू केल्यानंतर वार्षिक उत्पन्न वाढत गेले. २०१५ मद्ये ५० लाख रूपये वार्षिक उत्पन्न झाले होते. तर २०१९ मध्ये दोन कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.