प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा आज पहिला स्मृतीदिन. १४ मार्च २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहे यातली आर्वजून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे म्हणजे स्टीफन आणि जेन हॉकिंग यांच्या निस्वार्थी प्रेमाची गोष्ट होय. आज स्टीफन जरी आपल्यात नसले तरी ‘द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ या चित्रपटातून त्यांच्या प्रेमाची गोष्ट जिवंत आहे.

स्टीफन आणि जेन हॉकिंग एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची जोडपी. ऐन तारूण्यात ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, पुढे विवाहबंधनात अडकले. २५ वर्षे या जोडप्यानं सुखानं संसार केला. कमी वयातच स्टीफनला मोटारन्यूरॉन म्हणजे मज्जासंस्थेच्या घातक आजाराने ग्रासले. स्टीफन यांचं शरीर काम करणं बंद झालं त्यांचं आयुष्य व्हिलचेअरला खिळलं पण जेननं स्टीफन यांची साथ कधीच सोडली नाही. स्टीफन आणि जेन यांनी १९६५ साली लग्न केलं. तेव्हा जेन २१ वर्षांची होती.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

कॉलेजच्या काळात स्टीफन आणि जेन एकमेकांच्या प्रेमात पडले. स्टीफनला मोटारन्यूरॉन झाला असल्याची पूर्ण कल्पना जेनला होती. तो कधीही बरा होणार नाही, त्याला कधीही मृत्यू गाठू शकतो ही माहिती असताना देखील जेननं लग्नाला होकार दिला. या प्रेमकथेवर २०१४ साली ‘द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ हा चित्रपटदेखील आला.  ‘स्टीफनला तरुण वयातच दुर्धर आजारानं ग्रासलं होतं, तो आणखी किती वर्षे जिवंत राहील याची शाश्वती नव्हती. मला त्याच्यासोबत जितके कमी क्षण मिळतील ते आनंदानं घालवायचे होते म्हणूनच आम्ही फार कमी वयातच विवाहबंधनात अडकलो’ असं जेन एका मुलाखतीत म्हणाली होती.

१९९० साली आर्थिक आणि भावनिक कारणं देत स्टीफन हॉकिंग य़ांनी जेन यांना घटस्फोट दिला. स्टीफन यांचं आजारपण, दोघांचे भिन्न स्वभाव, यातून आलेल्या नकारात्मक भावना, तणाव यामुळे जेन आणि स्टीफनचे नंतर वारंवार खटके उडत असल्याचंही सांगितलं जात होतं. घटस्फोटानंतर जेननं जोनाथन जेन नावाच्या आपल्या संगीतकार मित्राशी लग्न केलं. तर स्टीफन यांनी एलिन मेसन यांच्यासोबत लग्न केलं पण स्टीफन यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही.