21 January 2021

News Flash

बाप तसा बेटा… स्टीव्ह आयर्विनच्या १५ वर्षीय मुलाने शेअर केली भावनिक पोस्ट

'त्याच जागी... त्याच मगरीला खायला घालताना, फरक फक्त १५ वर्षांच्या काळाचा'

रॉबर्ट आयर्विन आणि स्टीव्ह आयर्विन

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीव्ह आयर्विन याचा मुलगा रॉबर्ट आयर्विन हा अवघ्या पंधरा वर्षांचा आहे. मात्र स्टीव्हप्रमाणेच आपल्या वडिलांचा वसा रॉबर्ट पुढे चालवत आहे. रॉबर्टही स्टीव्हप्रमाणेच साहसी असून त्यालाही मगरींबद्दल विशेष प्रेम आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. असाच प्रकारचा एक फोटो रॉबर्टने नुकताच इन्स्ताग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये रॉबर्ट आपल्या वडिलांप्रमाणेच मगरींना खायला देताना दिसत आहे.

स्टीव्हचा प्राणीसंवर्धनाचा वसा त्याची पत्नी टेरी, मुलगा रॉबर्ट, मुलगी बेंडी यांनी त्याच्या मृत्यूनंतरही सुरु ठेवला आहे. ४ सप्टेंबर २००६ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी स्टीव्हचे निधन झाले. ‘ओशन्स डेडलीएस्ट’ या माहितीपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. चित्रिकरणासाठी समुद्रात उतरलेल्या स्टीव्हच्या छातीवर स्टिंगरे माशाच्या शेपटीचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूने खचून न जाता टेरी आयर्विनने मुलांच्या सोबतीने आयर्विन कुटुंबियांच्या मालकीचे ‘क्विन्सलॅण्ड रेप्टाइल अॅण्ड फॉना पार्क’चे काम सुरु ठेवले आहे. याच पार्कमधील एक पोटो नुकताच रॉबर्टने इन्स्ताग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा म्हणजेच स्टीव्हचा आणि स्वत:चा फोटो एकत्र करुन पोस्ट केला आहे. पहिल्या फोटोमध्ये स्टीव्ह एका मगरीला खायला देताना दिसत आहे. या फोटोच्या बाजूच्या फोटोत रॉबर्टही तशाच पद्धतीने मगरीला खायला देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रॉबर्ट कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘बाबा आणि मी म्युरे (या मगरीला) खायला घालताना. तिच जागा आणि तिच मगर फरक फक्त १५ वर्षांच्या काळाचा.’

 

View this post on Instagram

 

Dad and me feeding Murray… same place, same croc – two photos 15 years apart

A post shared by Robert Irwin (@robertirwinphotography) on

मागील १३ वर्षांपासून स्टीव्हचे कुटुंबिय त्याचे कार्य पुढे नेत आहे. अनेक ठिकाणी स्टीव्हची पत्नी आणि दोन्ही मुले प्राणी संवर्धनासंदर्भात जागृक्ता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 5:29 pm

Web Title: steve irwins son feeds same crocodile at same place as his dad 15 years apart scsg 91
Next Stories
1 धोनीला भेटण्यासाठी 3860 किमी प्रवास करून ‘ती’ पोहचली इंग्लंडला
2 अवघ्या दीड सेंटीमीटरची सोन्यापासून बनवलेली विश्वचषकाची ट्रॉफी पाहिलीत का?
3 VIDEO: ‘इंग्लंड किंवा न्यूझीलंड संघाने आत्महत्या केली तर पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल’
Just Now!
X