18 September 2020

News Flash

‘कोणाच्याही लग्नात जाऊन जेवू नका’, शिक्षणसंस्थेची हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना नोटीस

ही नोटीस सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे

विद्यार्थ्यांना नोटीस

सध्या लग्नसराईचा काळ आहे. अशा लग्नसराईच्या काळात अनेक ठिकाणी लग्न समारंभांमध्ये अनोळखी लोक जेवणावर ताव मारून जाण्याचे प्रकारही वेळोवेळी समोर येतात. आमिर खानच्या थ्री इडियट सिनेमामधील असाच एक सीन सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र खरोखरच एका शैक्षणिक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे लग्नांमध्ये घुसखोरी न करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. हरयाणाच्या कुरुक्षेत्रमधील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने ही नोटीस बजावली असून आमंत्रणांशिवाय शहरामधील कोणत्याही लग्नसमारंभांना किंवा पार्टीला जाऊ नका असं प्रशासनाने विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

हरियाणातील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने काढलेली ही नोटीस सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली आहे. १६ मार्च रोजी कॉलेजच्या लेटरहेडवर काढलेल्या या नोटीसमध्ये आमंत्रणाशिवाय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लग्नसमारंभांना आणि पार्टीला जाणे योग्य दिसत नाही असं म्हटलं आहे. ‘आपल्या संस्थेमधील काही विद्यार्थी शहरांमधील लग्नांना तसेच पार्ट्यांना आमंत्रण नसताना हजेरी लावत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अशाप्रकारचे वागणे हे पूर्णपणे अयोग्य/ अनावश्यक/ असभ्य/ अनैतिक आहे. अशाप्रकारचे असभ्य वर्तन संस्थेच्या कोणत्याही विद्यार्थ्याने करु नये. कोणी असं केल्यास त्या विद्यार्थ्यांविरोधात संस्थेच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल,’ अशा शब्दांमध्ये या नोटीसमधून विद्यार्थ्यांना इशारा देण्यात आला आहे.

ही नोटीस हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य वॉर्डनने पाठली आहे. मात्र हॉस्टेलच्या खाणावळीमधून तेच तेच अन्नपदार्थ खाण्याऐवजी विद्यार्थी अशाप्रकारे शहरांमधील लग्न समारंभांमध्ये ओळख नसताना जात असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. काहींनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी लग्न समारंभांना जाऊन जेवणे चुकीचे नसल्याचे म्हटले आहेत तर काहींनी असे प्रकार म्हणजे संस्थेमधील खाणावळीतील अन्नपदार्थ किती सुमार दर्जाचे असतात हे दाखवतात अशी टिका केली आहे.

माझा भाऊ करायचा असं

मी ही नोटीस त्याला दाखवली तेव्हा तो म्हणाला…

१००-१५० प्लेट जास्त

तो त्यांचा हक्क आहे

खाणावळीतील जेवणही असभ्य आहे म्हणून

आम्ही कॉलेजला असताना असं काही झालं नाही नशीब

आम्ही २००० साली केलयं हे

असं होणे म्हणजे हॉस्टेलमधील खाणावळीवर प्रश्नचिन्ह

आता या नोटीसनंतर खरोखरच विद्यार्थी अशाप्रकारे अनोळखी लग्नसमारंभांना जाणं थांबवणार की अशा विद्यार्थ्यांवर संस्था खरच कारवाई करणार हे येणारा काळच सांगेल. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हॉस्टेलमधील खाणावळीला कंटाळून मुले शहरांमधील समारंभांना हजेरी लावत असल्याचे समोर आले आहे असं नेटकऱ्यांच्या चर्चेतून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 11:32 am

Web Title: stop gate crashing weddings or face action nit kurukshetra warn students
Next Stories
1 एका विद्यार्थासाठी सरकारने कोट्यवधी खर्चून उभारली शाळा
2 …म्हणून होळीच्या दिवशी या गावांमध्ये पाळला जातो दुखवटा
3 आज दिवस आणि रात्र असतील समान
Just Now!
X