व्हेनिसमध्ये पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डेहराडूनच्या भूमिका शर्माने मिस वर्ल्डचा किताब पटकवला. भूमिकाचा हा प्रवास सोपा नव्हता. कोणताही किताब सहजा सहजी मिळत नाही. भूमिका देखील त्याला अपवाद नाही. जीममधील एका प्रशिक्षकाने दाखवलेल्या व्हिडिओला आकर्षित होऊन तिने बॉडी बिल्डिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्राविषयीचे आकर्षण कसे निर्माण झाले याची माहिती काही दिवसांपूर्वी भूमिकाने एका मुलाखतीमध्ये दिली होती. ती म्हणाली होती की एकदा मी जीममध्ये व्यायाम करत असताना त्या जीममधील प्रशिक्षकांनी मला महिला बॉडी बिल्डरचा एक व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहून मी थक्क झाले. यापूर्वी मी पुरुषांसारखे महिलांचे शरीर पिळदार असू शकते, असा विचारही केला नव्हता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या क्षेत्रात मी काहीतरी करु शकते, असा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर मी या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

तिचा हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. कुटुंबियांचे मनपरिवर्तन केल्यानंतर अथक शारीरिक परिश्रमातून तिने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलीने नेमबाजीमध्ये नाम कमवावे, अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. मात्र आपले स्वप्न बाजूला ठेवून भूमिका शर्माच्या पालकांनी तिला या क्षेत्रातील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. बॉडी बिल्डिंगच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी सरावादरम्यान तिला मानेची दुखापत उदभवली. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तिने आपण निवडलेला मार्ग चुकीचा नसल्याचे दाखवून दिले. या क्षेत्रात आल्यानंतर तिला अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र या क्षेत्रातील महिलांकडे देखील सन्मानाने पाहिले पाहिजे, हा विचार पक्का करुन ती आपला प्रवास करत राहिली. आज ती यशाच्या शिखरावर आहे. लठ्ठपणा असल्यामुळे तिची थट्टा ही केली जायची. मात्र आता कर्तृत्त्वामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. भूमिका डेहराडूनमधील जसपाल राणा संस्थेत सध्या बीपीएडचे शिक्षण घेत आहे. मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर आता ती ‘मिस युनिव्हर्सल’ होण्याचे स्वप्न बाळगून आहे.