26 October 2020

News Flash

झूमवर मीटिंग सुरू असताना कपल कॅमेरा बंद करायला विसरलं अन् असं काही दिसलं की…

विद्यार्थ्यांसाठी पालिकेची झूमवर सुरू होती बैठक

फोटो सौजन्य - रॉयटर्स

सध्या जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या किंवा सरकारी संस्था आपल्या बैठका ऑनलाइन घेताना दिसत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचं सत्र गेल्या चार पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय. परंतु अनेकदा मीटिंग दरम्यान अनावधानानं कॅमेरा सुरू राहतो आणि माणसं असं काही करतात की नंतर त्यांना त्याची लाजही वाटते. ब्राझीलमधूनही अशी एक घटना समोर आली आहे. झूमवर सुरू असलेल्या बैठकीदरम्यान एक कपल कॅमेरा बंद न करताच सेक्स करताना दिसलं.

ब्राझीलच्या रियो-डी-जेनेरियामध्ये सिटी काऊंसिलच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. करोना महामारीदरम्यान म्युनिसिपल सिस्टमद्वारे विद्यार्थ्यांना खाद्य संरक्षण कसं देता येईल यावर या बैठकीदरम्यान चर्चा सुरू होती. स्थानिक वृत्तपत्र मेट्रोपोलिसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या बैठकीत शहरातील काही प्रमुख व्यक्तीही उपस्थित होत्या असंही सांगण्यात आलं.

या बैठकीदरम्यान, एक सदस्य अचानक बैठकीतून बाहेर गेला. परंतु जाताना तो आपला कॅमेरा बंद करण्यास विसरला. त्यावेळी त्यांचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. वृत्तपत्र ग्लोबोने दिलेल्या वृत्तानुसार तो काऊंसलर नव्हता. सकाळी १० वाजता ही बैठक सुरू झाली आणि सलग चार तास ही बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्यांनी हा प्रकार पाहिला. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करत चर्चा सुरू ठेवली.
“आम्ही असा प्रकार घडत असल्याचं पाहिलं. परंतु आम्ही त्वरित ऑडिओ आणि व्हिडीओ कंट्रोल करणाऱ्या टीमला फीड बंद करण्यास सांगितलं.” अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या सोशलिझम अँड लिबर्टी पार्टीचे नेते लिओनेल ब्रिजोला यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 9:00 am

Web Title: story couple caught having sex while video conference meeting on zoom brazil coronavirus food security jud 87
Next Stories
1 Video: …म्हणून शेतकऱ्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गायीला केलं एअरलिफ्ट
2 वास्तवाचं भान देणाऱ्या आधार कार्डचे फोटो काढणाऱ्यांपासून…; World Photography Day निमित्त अरविंद यांची मजेदार पोस्ट
3 Viral Video : न्यूज चॅनेलने धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रियेसाठी भलत्याच ‘युवराज सिंग’ला केला कॉल, अन्…
Just Now!
X