19 March 2019

News Flash

फेकन्युज : ‘निर्वासित’ चिमुकला मारवान..

सीरियातील बॉम्बहल्ल्यात चिमुकल्याची आई व बहिण मारल्या गेल्या आहेत, अशी ‘पोस्ट’ प्रसारित झाली आहे.

सीरियातून जॉर्डनच्या सीमेवर एक चिमुकला येऊन धडकला आहे. तो निर्वासित आहेच, पण त्याच्यासोबत ना कोणी शेजारी, ना आईवडील, ना बहीणभाऊ! संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्त कार्यालयाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी या चिमुकल्याला ताब्यात घेतले. सीरियातील बॉम्बहल्ल्यात चिमुकल्याची आई व बहिण मारल्या गेल्या आहेत, अशी ‘पोस्ट’ प्रसारित झाली आहे.

खरी गोष्ट ही आहे की मारवान हा निर्वासित आहेच, पण तो जॉर्डनमध्ये एकटाच आलेला नव्हता. निर्वासितांच्या जथ्यांमध्ये त्याची चाल मंदावल्याने तो त्यांच्यापासून काही अंतर मागे पडला. यात त्याची आई आणि इतर कुटुंबीयही आहेत. त्याच्या हातात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत कपडे नव्हतेच. तो मागे पडल्याची ‘संधी’ साधून हा क्षण ‘फोटोशाप्ड्’ करून काहींनी मांडला. या घटनेबद्दल काही वृत्तपत्रांचाही अंदाज काही काळांसाठी चुकला होता.

First Published on March 9, 2018 12:43 am

Web Title: story of small kid