News Flash

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

जखमी असल्याने तिला उठता येईना

या दोघांची नावे लूसी आणि पांडा आहे. Imgur या सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकण्यात आला

संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र हे आपण नेहमी ऐकतो. आतापर्यंत मैत्रिला जागलेल्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण त्यापेक्षाही ही कथा नक्कीच वरचढ चढेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक कुत्रा कडाक्याच्या थंडीतही दुस-या कुत्र्यासोबत बसलेला दिसून येत आहे. त्यातला एक कुत्रा जखमी असल्याने त्याला अजिबातच उठता येत नाही. या दोघांच्याही अंगावरून अनेकदा ट्रेन जाते पण तरीही ते एकमेकांची साथ सोडत नाही असा हा व्हिडिओ आहे.

वाचा : ‘तिने’ केली त्याच्यासोबत ७०० किमीची पायी तीर्थयात्रा

मैत्री आणि प्रेम म्हणजे काय असे जर कोणी विचारले तर हा व्हिडिओ पुढे कधीतरी नक्कीच दाखवला जाईल. नर आणि मादा कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्या मादीला पायाला जखम झाल्याने तिला उठणे अश्यक्य होते. अशा वेळी कुत्रा दोन दिवस तिच्या शेजारी रेल्वेरुळावर बसून होता. अनेकदा या दोघांच्याही अंगावरून रेल्वे गेली पण हे दोघेही जागचे हलले नाही. युक्रेनमधल्या डेनिस मालाफेजीव नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी होत असून देखील त्याने आपल्या मैत्रिणीची साथ सोडली नाही. मदत येत नाही तोपर्यंत ते एकमेकांसोबत बसून होते. या रेल्वे रुळाशेजारी असलेल्या गावाक-यांनी कुत्र्यांची मदत करण्यासाठी बचाव पथकाला बोलावले. या जखमी कुत्रीवर उपचार करण्यात आले. हे दोन्ही कुत्रे एकाच परिवारात राहतात. या दोघांची नावे लूसी आणि पांडा आहे. Imgur या सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकण्यात आला त्यानंतर आतापर्यंत लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला.

VIRAL VIDEO : लेटर बॉक्समध्ये दडून बसला विषारी पाहुणा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:16 pm

Web Title: story of true love dog stayed under the passing train for two days with an injured friend
Next Stories
1 तब्बल ७४२४ किलोमीटर सायकलने प्रवास करून आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने मोडला विश्वविक्रम
2 चीनच्या प्रयोगशाळेत केली जातेय मोठ्या प्रमाणात डासांची पैदास
3 ‘तिने’ केली त्याच्यासोबत ७०० किमीची पायी तीर्थयात्रा
Just Now!
X