06 March 2021

News Flash

Video : बघता काय ! IIT Bombay च्या वर्गात शिरली गाय

'ज्या शिक्षणसंस्थेत भल्याभल्यांना उत्तम गुण मिळुनही प्रवेश मिळत नाही तेथील विद्यार्थ्यांच्या वर्गात गायीला प्रवेश मिळतो, तुमच्यापेक्षा गाय नशीबवान'

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या कॅम्पस परिसरात काही दिवसांपूर्वी मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने एका विद्यार्थ्यांला शिंगांनी उचलून फेकल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता या कॅम्पसमधून एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीत चक्क एक गाय शिरल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक असताना ही गाय वर्गात आल्याचं दिसतंय. गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षक करताना दिसत आहेत पण ही गाय मात्र वर्गात बिनधास्त फिरताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘ज्या शिक्षणसंस्थेत भल्याभल्यांना उत्तम गुण मिळुनही प्रवेश मिळत नाही तेथील विद्यार्थ्यांच्या वर्गात गायीला प्रवेश मिळतो, तुमच्यापेक्षा गाय नशीबवान’ अशाप्रकारचे विनोदी संदेश नेटकरी हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना पोस्ट करत आहेत.
पाहा व्हिडिओ –

काही दिवसांपूर्वी याच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याला बैलाने उचलून फेकल्याची घटना घडल्यानंतर मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच विरोध केला होता. मोकाट फिरणाऱ्या बैलांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी गाडी घेऊन आल्याचं समजताच तिथे प्राणिमित्र रहिवासी आणि आयआयटीचे विद्यार्थी जमले व त्यांनी बैलाला पकडण्यास विरोध केला. या नाटय़ामुळे सकाळी या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था! 

देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम असल्याचे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले आहे.

जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ने प्रकाशित केली आहेत. त्या क्रमवारीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी, आयआयटी दिल्ली १८२व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ १८४व्या स्थानी आहे. २३ भारतीय संस्थांपैकी चार संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले आहे. सात संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही.

आयआयटी मुंबईचे स्थान तेथील संशोधनामुळे वाढले आहे. विशेष म्हणजे निव्वळ प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित राहणाऱ्या संशोधनाचा विचार या क्रमवारीत केला जात नाही. तर ज्या संशोधनाने अर्थकारणाला आणि जीवनमान उंचावण्याला चालना मिळते त्या संशोधनाचा विचार केला जातो. त्या अनुषंगाने आयआयटी मुंबईतील संशोधनाच्या उपयुक्ततेची पातळी ही जागतिक किमान दर्जापातळीपेक्षा अधिक असल्याने त्यांचे स्थान पक्के राहिले आहे.

मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ सर्वोच्च स्थानी!

जगातील एक हजार विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे याच विद्यापीठातील ‘मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेने तब्बल आठ वर्षे सर्वोत्तम शिक्षण संस्थेचे स्थान कायम राखले आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही दोन्ही विद्यापीठे जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असून आशियात सर्वोत्तम क्रमवारीत आहेत.

क्यू एस रँकिंग म्हणजे काय?

क्वॅकरेली सायमंडस् या शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनीतर्फे जगभरातील विद्यापीठांची आणि शिक्षणसंस्थांची वार्षिक क्रमवारी ‘क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या वार्षिकांकात प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे या क्रमवारीला ‘क्यूएस रँकिंग’ असेच नाव पडले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 9:30 am

Web Title: stray cow enters classroom in iit bombay viral video sas 89
Next Stories
1 तिने ज्वालामुखीत उतरुन वाचवले पतीचे प्राण
2 VIDEO: ‘ढिंच्याक पूजा’चे ‘नाच के पागल’ हे नवीन गाणं ऐकून नेटकरी झाले पागल
3 …म्हणून वांगणीजवळ पूराच्या पाण्यात अडकली महालक्ष्मी एक्सप्रेस
Just Now!
X