23 January 2021

News Flash

योग दिवस तर आहेच, पण २१ जूनचं हे वैशिष्ट्य तुम्हाला माहितीये?

आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते

तसा २१ जून हा दिवस आपल्यासाठी रोजच्या दिवसासारखा. या दिवसात काय स्पेशल असणार म्हणा. फार फार तर आपल्या ओळखीच्या व्यक्तींचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, योग दिवस वगैरे असेल. पण या गोष्टी तूर्तास तरी बाजूला ठेवा कारण २१ जून या तारखेचं महत्त्व त्याहूनही वेगळं आहे. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. त्यामुळे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग बदलतो आणि त्यामुळेच हळूहळू दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. आज १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.

भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी आहेत. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते . काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. आपल्या इथे जरी तीन ऋतू असले तरी अनेक देशांत हिवाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू असतात. तेव्हा नाच गाणी, मेजवाजी अशा उत्साहात २१ जून दिवस साजरा केला जातो.

२१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 8:11 am

Web Title: summer solstice 2020 21 june is longest day of the year nck 90
Next Stories
1 नागपूर पोलीसही पडले गुलाबो-सिताबोच्या प्रेमात
2 महाभारत नेमकं कशामुळे घडलं होतं?
3 कहर… ४५ वर्षीय महिलेने केला ३ कोटी २० लाखांचा घोटाळा; शेकडो विमान तिकीटं बूक करुन करायची ‘हा’ दावा
Just Now!
X