News Flash

पाठिशी हात, पायाशी योगा मॅट! डेविड वॉर्नर, राशिद खान मनिष पांडे नक्की करतायत काय?

सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज डेविड वॉर्नर याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये वॉर्नरसोबत राशिद खान आणि मनिष पांडे देखील दिसत आहेत.

डेविड वॉर्नर नक्की करतोय काय? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सनरायजर्स हैदराबादचा तडाखेबाज फलंदाज डेविड वॉर्नर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे कुटुंबीयांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने शेअर केलेल्या व्हिडिओंना लाखोंच्या घरात व्यूज मिळतात. नुकताच त्यानं एक व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओमध्ये स्वत: डेविड वॉर्नर, बांगलादेशी फिरकीपटू आणि सनरायजर्सची फिरकीची भिस्त असणारा राशिद खान आणि भारताचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे दिसत आहेत. या तिघांचे हात मागे बांधल्यासारखे दिसत असून त्यांच्या पायाखाली योगा मॅट आहे. त्यामुळे नेमकं हे तिघं काय करत आहेत, याची उत्सुकता चाळवली गेली, की हा व्हिडीओ नेमका काय आहे, हे स्पष्ट होतं.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

डेविड वॉर्नरनं शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ८ लाखांच्या जवळपास व्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच अडीच हजार लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये डेविड वॉर्नर, राशीद खान आणि मनिष पांडे हे तिघे सनरायजर्स हैदराबादचे खेळाडू गुडघ्यांवर बसलेले दिसून येत असून त्यांच्या पायाखाली योगा मॅट आहे. हिरव्या बॅकग्राऊंड क्रोमावर हे तिघे बसले असून तिघे बसल्याबसल्याच डान्सच्या स्टेप करत आहेत. एका जाहिरातीसाठी हे तिघे शूट करत असून त्यासाठीची एक अजब स्टेप हे तिघे करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना डेविड वॉर्नरनं Our Attempts of Commercial अशी कॅप्शन देखील दिली आहे!

 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

इन्स्टावर डेविड वॉर्नरचे अनेक व्हिडीओ!

डेविड वॉर्नरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

काही दाक्षिणात्य चित्रपटांमधल्या गाण्यांवरचे हे व्हिडीओ आहेत. यामध्ये कलात्मकतेनं डेविड वॉर्नरचा चेहरा वापरल्याचं दिसून येत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

डेविड वॉर्नरचा प्रचंड मोठा फॅनफॉलोविंग पाहाता त्याच्या या व्हिडिओंना आणि त्याच्या फोटो पोस्ट्सला देखील प्रचंड प्रतिसाद मिळतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

तसाच, त्याच्या ताज्या व्हिडीओला देखील मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 8:47 pm

Web Title: sunrisers hyderabad batsman david warner instagram account viral video pmw 88
Next Stories
1 झोमॅटोनं विचारलं “खाना खा लिया?” उत्तर आलं, “येस मम्मी”!
2 काळ बदलला… बाबा का ढाबाचे कांता प्रसाद पुन्हा ग्राहकांच्या प्रतिक्षेत
3 Swiggy ने विचारलं, ‘जेवलीस का?’; उद्धव ठाकरेंच्या फोटोपासून आई काय म्हणालीपर्यंत मराठी पोरा-पोरींनी दिले भन्नाट रिप्लाय
Just Now!
X