एकीकडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची CSK दमदार कामगिरी सुरू असतानाच दुसरीकडे संघाताली स्टार खेळाडूंच्या मुली एकमेकींशी मैत्री करण्यात दंग झाल्या आहेत. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग या तिघांच्या मुलींचा एकत्र खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरेश रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये धोनीची मुलगी झिवा, रैनाची मुलगी ग्रेसिया आणि हरभजनची मुलगी हिनाया खेळताना पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/BiJOmSDlEl3/

#InternationalDanceDay : या भन्नाट बॉलिवूड स्टेप्सवर तुम्ही थिरकलात का?

या तिघींची सध्या चांगलीच मैत्री जमली असून ‘रिंगा रिंगा रोजेस..’ खेळतानाचा हा व्हिडिओ आहे. CSKच्या या चिमुकल्या BFF सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. झिवा आणि ग्रेसियामधील मैत्री याआधीही बऱ्याचदा पाहायला मिळाली. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या रैनाने याआधीही झिवा आणि ग्रेसियाच्या खेळतानाचे, गप्पा मारतानाचे बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यापैकीच हे आणखी काही फोटो..

https://www.instagram.com/p/BiB2qsRnYg2/

https://www.instagram.com/p/BhTD2XmnvDi/