आपल्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या चालकाला तामिळनाडूतील एक जिल्हाधिकाऱ्यानं अनोखी भेट दिली आहे. चालकाच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अनेकांनी त्यांना शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या पण करुरचे जिल्हाधिकारी टी अंबाझगान यांनी कायस्वरूपी आठवणीत राहिल अशी भेट चालक परमशिवम् यांना दिली.

परमशिवम् गेल्या ३५ वर्षांपासून सरकारी सेवेत चालक म्हणून रुजू आहे. येथे येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी गाड्यांचे चालक म्हणून ते काम पाहतात. ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यानिमित्त छोटासा कार्यक्रम आयोजित झाला. अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू पाठवल्या. पण अंबाझगान यांनी मात्र परमशिवम् यांना आश्चर्यचा धक्काच दिला.

गेल्या काही वर्षांपासून ते अंबाझगान यांच्या सेवेत रुजू होते म्हणूनच शेवटच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: चालक झाले. परमशिवम् यांना आणि त्यांच्या पत्नीला गाडीच्या मागच्या सीटवर बसून त्यांना घरी सोडलं. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसोबत मिळून चहापानाचाही आनंद घेतला.