News Flash

मालकिणीवर बलात्कार करुन पळून जात होता आरोपी, पाळीव कुत्रा ठरला ‘हिरो’

पाळीव कुत्र्याची कमाल!

(प्रतिकात्मक छायाचित्र)

माणूस आणि कुत्र्यांमधील नातं नेहमी खास मानलं जातं. आपण कुत्र्यांच्या ईमानदारीच्या अनेक बातम्या वाचल्या आहेत. अशीच एक घटना आता तामिळनाडूच्या कोइंबतूरमधून समोर आली आहे. एका मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीची कुटंबाच्या पाळीव कुत्र्याने पँट पकडली आणि त्याचा रस्ता अडवला. नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

कोइंबतूरमधील 3 एप्रिल रोजीची घटना
टाइम्सनाउने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये 3 एप्रिल रोजी ही घटना घडली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव एस दिलीपकुमार असं आहे. २९ वर्षांचा दिलीपकुमार सोनार काम करतो. रात्री आरोपी सेल्वपुरम येथे मनोरुग्ण महिला रहात असलेल्या घरात गेला. ३० वर्षीय पीडित महिला एका शेडमध्ये राहते, तर त्याच आवारात मागे घरात अन्य कुटुंबिय राहतात. पकडले जाऊ नये यासाठी त्याने आपली गाडी पीडितेच्या घरापासून जवळपास २०० मीटर दूर उभी केली होती.

कुत्र्याने पकडली आरोपीची पँट :-
थोड्यावेळाने तिथे आलेल्या घरच्या पाळीव कुत्र्याला आरोपी दिलीपकुमार दिसला. कुत्र्याला बघून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, कुत्र्याने त्याची पँक पकडली, रस्ता अडवला आणि आरोपीला हालचाल करू दिली नाही. कुत्र्याच्या भूंकण्याने आणि शेडमधील लाइट बंद असल्याचं बघून पीडितेचे कुटुंबिय शेडमध्ये गेले आणि त्यांनी आरोपीला बघितलं. तातडीने शेजरच्यांच्या मदतीने त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग
पोलिसांनी आरोपीला अटक करुन आयपीसी कलम 376 (2) (e) आणि 506 (i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने मोबाइलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचंही तपासात समोर आलं. तपासामध्ये आऱोपीने पीडित महिलेवर यापूर्वी दोनदा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. त्याने मोबाइलमध्येही घटनेचं रेकॉर्डिंग केलं होतं. पीडित महिला मनोरुग्ण असल्याने आरोपी आरामात पळून जाण्यात यशस्वी ठरत होता असं समजतंय. पण यावेळी पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 11:37 am

Web Title: tamil nadu pet dog grabs man who attempted to flee after raping mentally challenged woman sas 89
Next Stories
1 आनंद महिंद्रांचा मदतीचा हात! गोरगरिबांसाठी फक्त १ रुपयात इडली, ‘त्या’ आजीबाईंना मिळणार हक्काचं घर
2 तो एवढी दारु प्यायला होता की पोलिसांचा ब्रिद अ‍ॅनलायझरही तुटला
3 ‘l;;gmlxzssaw’ हा आहे अमेरिकेचा एक Nuclear Code?; जाणून घ्या गोंधळ उडवून देणाऱ्या त्या ट्विटची गोष्ट
Just Now!
X