News Flash

पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून ‘या’ गावांत फटाके फोडतच नाही!

गावकऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून फटाके फोडलेच नाहीत

तामिळनाडूत अशी अनेक गावं आहेत जी स्वत:च्या आनंदापेक्षा आधी मुक्या जीवांचा विचार करतात. (प्रातिनिधिक छायाचित्र)

फटाक्यांवर बंदी असावी की नाही यावरून देशभरात वाद सुरू आहे. दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी आणल्यानंतर देशातील अनेक राज्यांतदेखील फटक्यांच्या विक्रीवर बंदी आणावी की आणू नये? यारून गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद पेटला आहे. फटाके विक्रीच्या बंदीबाबत अनेक राजकारण्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘फक्त दिवाळीतच फटाक्यांवर बंदी का?’, ‘हा अन्याय आहे’ असं म्हणत फटाके विक्रीला बंदी घालण्यास काही नेत्यांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक आणि मुक्या जीवांना होणारा त्रास लक्षात घेऊन सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाके न फोडण्याची विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला केली आहे.

अन् एका सामान्य मुलीला खरंच स्वप्नातला ‘राजकुमार’ भेटला

हा संपूर्ण वादविवाद सुरू असताना तामिळनाडूतल्या अनेक गावांनी मात्र फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यात फटक्यांवर बंदी नाही, तरीही मुक्या जीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तामिळनाडूतील अनेक गावं गेल्या कित्येक वर्षांपासून फटाके न फोडता प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करतात. वेल्लोडे पक्षी अभयारण्याशेजारील अनके गावं गेल्या अठरा वर्षांहून अधिक काळ फटाके न फोडताच आपली दिवाळी साजरी करत आहेत. साधरण ऑक्टोबर महिन्यांपासून अनेक स्थलांतरित पक्षी येथे येतात. या पक्ष्यांना प्रदूषणाचा आणि आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी एकमताने फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिरूनलवेलीमधल्या कूतनकुलम गावातील गावकऱ्यांनीदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडले नाहीत. फक्त दिवाळीतच नाही तर इतरही सणासुदीला पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी गावकरी घेतात.

तुम्हाला माहितीये ‘या’ देशात दिवाळीत चक्क श्वानांची पूजा केली जाते

वव्वाल तोप्पु गावातील गावकरीदेखील फटाके फोडत नाही, कारण वटवाघळांना त्याचा त्रास होतो. तामिळनाडूत अशी अनेक गावं आहेत जी स्वत:च्या आनंदापेक्षा आधी मुक्या जीवांचा विचार करतात. फटाके न फोडण्याचा गावकऱ्यांचा निर्णय कौतुकास्पद आणि आदर्श घेण्यासारखा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 10:03 am

Web Title: tamil nadu villagers celebrate diwali without firecrackers to save birds
Next Stories
1 Video : सचिनने चाहत्यांना दिलेला संदेश तुम्हीही ऐकलाच पाहिजे!
2 त्याने चक्क ७० लाख लिटर पाण्याची केली नासाडी
3 इव्हांका ट्रम्पनेही दिल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा !
Just Now!
X