08 March 2021

News Flash

चेन्नईत भरलं कुत्र्यांचं रक्तदान शिबीर

५० कुत्र्यांपैकी ११ कुत्र्यांनी रक्तदान केलं, त्यांना डोनर कार्डही देण्यात आलं आहे

फोटो सौजन्य-ANI

माणसांचं रक्तदान शिबीर होतं हे आपल्याला ठाऊक आहे. रक्तदान महादान असंही म्हटलं जातं. चेन्नईत मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिरात ५० कुत्र्यांचा सहभाग होता. प्राण्यांना रक्ताची अवस्था भासली तर त्यासाठी एक ब्लड बँक असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. या रक्तदान शिबिरात गोळा केलेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत आणि त्यांना काही इजा झाली किंवा रक्ताची आवश्यकता भासली तर ते या रक्ताचा वापर करू शकणार आहे. या रक्तदान शिबीरात ५० कुत्र्यांनी सहभाग घेतला होता यापैकी ११ कुत्र्यांनी रक्तदान केलं. रक्तदान केलेल्या कुत्र्यांना डोनर कार्डही देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 4:57 am

Web Title: tanuvas animal blood bank department of clinics madras veterinary college yesterday conducted a voluntary dog blood donation camp on its campus
Next Stories
1 चौकीमध्ये आता कॉन्स्टेबल वडील आपल्या मुलाला करणार ‘सलाम’
2 १२ वर्षाची मुलगी देणार दहावीची परीक्षा
3 प्रेमासाठी जपानी राजकन्येनं त्यागलं राजपद
Just Now!
X