ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते ‘थ्रोबॅक थर्सडे ट्रेंड’ या नावानं आपल्या आठवणी सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात. ८ ऑक्टोबर रोजीही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील दोन फोटो शेअर केले. त्यांच्या फोटोंना त्यांच्या फॉलोअर्सची मोठी पसंतीही मिळत आहे. तसंच हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअरही होत आहेत. रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामवर ३० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

माझे मित्र लोऊ आणि रूडी यांच्या आठवतीत या गुरूवारी शालेय जीवनातील एक झलक सर्वांसमोर सादर करत आहे. माझी शाळा रिवरडेल कंट्री स्कूल, १९५५ च्या ईयरबूकमधील एक छोटासा भाग, असं टाटा यांनी हे फोटो शेअर करताना म्हटलं. दरम्यान, त्यांच्या फोटोला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही जर चित्रपटात आला असता तर आज सुपरस्टार असता, असं काही जणांनी म्हटलं आहे. तर तुम्ही दुसऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहोत असं काहींनी म्हटलं, तर काहींनी सर तुम्ही तर लेजंड आहात अशी प्रतिक्रिया दिली.

हा फोटो रतन टाटा यांनी थ्रोबॅक थर्सडे अशा कॅप्शनसह २३ जानेवारी रोजी शेअर केला होता. हा फोटो मी बुधवारीच शेअर करणार होतो. परंतु कोणी मला थ्रोबॅक थर्सडेबाबत सांगितलं. म्हणून मी लॉस एन्जेल्सच्या दिवसांचा फोटो शेअर करत आहे, असंही ते म्हणाले होते.