प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतील. हल्ली झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. आता हेच बघा ना काही अल्पवयीन मुलांनी तर सोशल मीडियावर केवळ लाईक मिळण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी स्वत:ला जाळून घेतले. स्वत:ला जाळून घेतल्याचा व्हिडियोही त्यांनी काढला आणि तो सोशल मिडियावर अपलोड केला आहे. रशियामधील पेन्झा शहरात हा प्रकार घडला आहे. काही मुलांनी ज्वलनशील पदार्थ आपल्या अंगावर ओतला आणि आग लागल्यावर त्यांनी पाण्यात उडी मारली. तीन चार मुलांनी स्वत:ला आग लावून अशा प्रकारे स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक जणांना सोशल मीडियाचे जणू व्यसनच लागले असते. बरेचदा शाळा, महाविद्यालयात जात असलेली मुले फेसबुकसारख्या सोशल मीडियावर अँक्टीव्ह असतात. आपले फोटो, पोस्ट ही मुले फेसबुकवर अपलोड करत असतात. पण इतरांहूनही वेगळ काहीतरी करण्याची मानसिकता या मुलांमध्ये असते. म्हणूच या मुलांनी हे पाऊल उचलल्याचे कळते. हा स्टंट आपल्या जीवावर बेतू शकतो हे माहित असताना देखील फक्त काही लाईक मिळवण्यासाठी या मुलांनी तो केला असल्याचे समजते आहे. या मुलांना फायर स्टंट कसे करायचे याची कोणतीही कल्पना नव्हती यात शरीराला जखम होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो याची कल्पना असतानाही एवढे मोठे धाडस या मुलांनी केले.