News Flash

Video : अन् तिने टेनिस कोर्टमध्येच केस कापले

सामना सुरू असताना कात्रीने वेणी कापून टाकली

तिस-या सेटमध्ये तिने पंचाकडून कात्री मागून घेतली आणि आपली वेणी कापून टाकली.

रशियाची सुप्रसिद्ध टेनिसपटू स्वेतलाना कुझ्नेत्सोवानं हिचा सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिने चक्क टेनिस कोर्टवरच आपले केस कापून टाकले. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीएच्या स्पर्धेत गतविजेती अॅग्निएस्काविरुद्ध तिचा सामना सुरू होता. मात्र खेळताना वेणी डोक्यावर आदळत असल्याने कात्री घेऊन तिने टेनिस कोर्टमध्येच ती कापून टाकली. तिस-या सेटमध्ये तिने पंचाकडून कात्री मागून घेतली आणि आपली वेणी कापून टाकली. ‘खेळताना वेणी सारखी माझ्या डोक्यावर येऊन आपटत असल्याने मी ती कापून टाकल्याचे’ स्वेतलानाने सांगितले. ‘माझे केस मला पुन्हा वाढवता येतील पण केसांमुळे जर मी सामना हरले असते तर मात्र मला दु:ख झाले असते म्हणून मी वेणी कापून टाकली’ असे तिने सांगितले. स्वेतलानाने हा सामना ७-५ ,१-६  ७-५ असा जिंकला असला तरी तिच्या यशापेक्षा वेणी कापण्याच्या या प्रकाराची जास्त चर्चा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:10 pm

Web Title: tennis player kuznetsova cuts her hair during the match
Next Stories
1 नेटिझन्स काहीही करु शकतात, #AnythingCanHappen हॅशटॅगवर रंगले नवे चर्चासत्र
2 Viral Video : ट्रम्पही म्हणतात ‘अबकी बार ट्रम्प सरकार’
3 Video: ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ चे कसब तुम्हाला थक्क करुन सोडेल
Just Now!
X