News Flash

Japan Earthquake: जपान भूकंपाचे हे व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

२०११ मध्ये आलेल्या भूकंपात १८ हजार बळी गेले होते

जपान मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

जपान मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. जपानच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे ६ च्या सुमारास जपानला ६.९ रिश्टर स्केल भूकंपचा धक्का बसला. या भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोपर्यंत जाणवले. या धक्क्यामुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा येऊन धडकल्या. हवामान खात्याने देखील त्सुनामीचा इशारा दिला होता. भूकंपाच्या धक्क्याने जपानी नागरिक घाबरून गेले आहे. २०११ मध्ये झालेल्या त्सुनामीची पुनरावृत्ती होईल की काय अशी भिती जपानला आहे.

२०११ मध्ये जपानला ७.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. यात जळपास १८ हजार नागरिक मरण पावले होते. या भूकंपातून जपान अजूनही पुरेसा सावरला नाही. जपानच्या अनेक भागात याच्या खुणा आजही आहेत. अशातच आज झालेल्या भूकंपाच्या तीव्र झटक्याने जपानी लोक घाबरून रस्त्यावर आले. सकाळची वेळ असल्याने अनेक जण झोपेत होते. याचे काही व्हिडिओ आणि दुकानाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. हे फुटेज पाहून या भूकंपाच्या तीव्रतेची तुम्ही कल्पना करू शकता. अनेक ठिकाणी भूकंपाच्या तरंगामुळे रस्तेही सरकू लागल्याचे दिसत होते. तर धक्क्याने वाहानेही जमीनीपासून काही इंच वर उचलली गेल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. खरं तर जपानमध्ये घरांची रचना ही भूकंप रोधक पद्धतीने करण्यात आली आहे. जपानला वारंवार भूकंपाचे धक्के जाणवात त्यामुळे घरांची कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने ती बांधण्यात येतात. तसेच प्रत्येक शाळांत मुलांना अशा आपातकालीन परिस्थितीत काय करावे याचे शिक्षणही दिले जाते. त्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवल्यास जपानी लोक अत्यंत संयम बाळगून परिस्थितीला समोर जातात. तर भूकंपच्या क्षेत्रात प्रत्येक घरात एक फस्ट ऐड बॉक्स असतोच ज्यात अशा परिस्थितीत उपयोगी पडणा-या वस्तूंचा समावेश असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:48 pm

Web Title: terrifying videos that capture the mayhem and chaos of japan earthquake
Next Stories
1 Video: आजीबाईंचा अनोख्या पद्धतीत बँक कर्मचाऱ्यांना सलाम!
2 ‘त्या’ बँक कर्मचाऱ्याची ह्दयस्पर्शी टिपण्णी सोशल मीडियावर व्हायरल
3 Viral : अर्धविरामाच्या टॅटूचा अर्थ माहितीये?
Just Now!
X