News Flash

Viral Video : पती फोन उचलत नाही म्हणून ‘ती’नं मुलाला गळफास लावला

मुलगा वेदनेने कळवळत होता

नवरा फोन उचलत नाही या रागातून थायलंडमधल्या एका महिलेने आपल्या लहान मुलाचा गळफास लावून जीव घेण्याचा प्रयत्न केला.

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती. जगात एकवेळ सगळेच आपली साथ सोडतील, पण आई शेवटपर्यंत आपला हात सोडणार नाही. आपल्या मुलासाठी ती वाट्टेल ते करेल. वेळ पडली तर एकटी साऱ्या जगाशी लढेल, आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी ती जीवही देईल. पण तुम्ही कधी एखाद्या आईला क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाचा अक्षरश: जीव घेताना पाहिलंत का? मग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. हे पाहून कोणालाही या आईची चीड येईल.

नवरा फोन उचलत नाही या रागातून थायलंडमधल्या एका महिलेने आपल्या लहान मुलाचा गळफास लावून जीव घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण कृत्याचा तिने व्हिडिओ तयार केला आणि तो तिनं आपल्या नवऱ्याला पाठवला. ‘तू माझे फोन उचलत नाही, तेव्हा तातडीनं येऊन तूझ्या मुलाला घेऊन जा. नाहीतर यापेक्षा आणखी काहीतरी वाईट होईल’ अशी धमकी ती व्हिडिओमधून नवऱ्याला देत होती.
हा मुलगा वेदनेने कळवळत होता, रडत होता, दोरखंड गळ्याभोवती आवळल्यानं त्याला श्वासही घेणं अवघड होत होतं. पण तरीही या आईला मुलाची दया आली नाही. तिने अनेकदा या मुलाला बेडवर आदळलंही. बऱ्याच वेळानंतर नवऱ्याची बहिण आणि आई तिच्या घरी पोहोचले आणि या मुलाची सुटका केली.

हे प्रकरण नंतर पोलिसांकडे पोहोचलं. तेव्हा मानसिक तणावामुळे आपण हे पाऊल उचललं असल्याचं तिनं कबूल केलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये काही वादही सुरू होते, तेव्हा नवऱ्याचा काटा काढण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. तिचं कारण काहीही असलं तरी या वादात एका निष्पाप जीवाचे हाल करणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न उरतोच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 5:11 pm

Web Title: thai woman hang her toddler beacause her husband didnt pick up her phone call
Next Stories
1 बापानं ५००००० रुपयांसाठी अल्पवयीन मुलीचं लग्न वृद्धाशी लावलं
2 Video : बापरे! या पाणीपुरीची किंमत ऐकून तोंडचं पाणी पळेल
3 रिलायन्स जिओच्या रिचार्जवरही आता कॅशबॅक!
Just Now!
X