News Flash

हाच खरा हिरो!; रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी दोन किमी धावला वाहतूक पोलीस

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केला सॅल्युट आणि शेअर

हैदराबाद : रहदारीच्या रस्त्यावरुन एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी धावणारा वाहतूक पोलीस.

भर गर्दीतून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी एक वाहतूक पोलीस सुमारे दोन किमी धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या पोलीसाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला सॅल्युट केला आहे. तसेच हाच खरा हिरो असल्याची भावनाही व्यक्त केली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा हैदराबादमधील असल्याचे कळते. संबंधित व्हिडिओ रुग्णवाहिकेतून चित्रित करण्यात आला आहे. या रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्यातून मार्ग काढणे रुग्णवाहिकेच्या चालकाला शक्य होत नव्हते. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या एका पोलिसाने स्वतः रुग्णवाहिकेला मार्ग काढून देण्यास मदत केली.

रहदारीच्या रस्त्यातून मार्ग काढताना हा पोलीस रुग्णवाहिकेच्या पुढे धावत होता, असा तो सुमारे दोन किमी धावला. रुग्णवाहिकेतून या धावणाऱ्या पोलिसाचे एकाने चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आदित्यराज कौल नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर माहितीही दिली आहे. यामध्ये हाच खरा हिरो! लोकांना निस्वार्थीपणे मदत करणाऱ्या या पोलिसाबद्दल खरंच आदर आहे, असं त्यानं लिहिलं आहे, जे अगदी समर्पक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 7:54 pm

Web Title: thats the real hero traffic police ran two km to clear the way for the ambulance aau 85
Next Stories
1 भारतीय बाजारपेठांमध्ये धोकादायक चिनी फटाके-लाइट्स?; जाणून घ्या सत्य काय
2 मोदींपासून रेहमानपर्यंत अनेकांनी शेअर केलेला ‘या’ चार वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ पाहिलात का?
3 भन्नाट ऑफर… ‘या’ गावात शिफ्ट होणाऱ्याला दर महिन्याला मिळणार सात लाख रुपये
Just Now!
X