ऑनलाइन फॅशन रिटेलर झलांडो एसईचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी रुबिन रिटर यांना कदाचित आपल्या पत्नीसाठी – १०० दशलक्षाहून अधिक डॉलर्सचा फटका बसू शकतो.

३८ वर्षीय रुबिन म्हणातात की, ते पुढील वर्षी निवृत्त होणार आहेत, जेणकरून ते त्यांच्या मुलांचा सांभाळ करू शकतील व त्यांच्या पत्नीला तिच्या करीअरकडे लक्ष देता येईल. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या २०१८ जाहीर केलेल्या पंचवार्षिक योजनेमुळे त्यांना ९३ दशलक्ष युरो(११२ दशलक्ष डॉलर्स)चा खर्च करावा लागणार आहे,असे ब्लूमबर्गने केलेल्या आकडेमोडीत दिसून आले आहे. या अब्जाधीश जोडप्याला आता दुसरे मुल होणार आहे.

मला माझ्या वाढत्या कुटुंबास जास्त वेळ द्यायचा आहे, असं रुबिन यांनी ६ डिसेंबर रोजी सांगितलं आहे. आगामी काही वर्षांसाठी तिच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षेला प्राधान्य दिले पाहिजे यावर मी आणि माझी पत्नी सहमत आहोत. असं त्यांनी म्हटलं होतं. रिटर यांची पत्नी न्यायाधीश आहे.

लैंगिक-समानतेच्या चर्चेत बर्लिन येथील या कंपनीने घेतलेला हा निर्णय प्रसिद्धिचा स्टंट आहे, असे काहींचे म्हणणे आहे. झलांडो कंपनीचे बहुतांश ग्राहक महिला असून त्यांच्या संचालक मंडळात पाच गौरवर्णीय पुरूष आहेत. मागील वर्षी ऑल ब्राईट फाउंडेशनने या कंपनीच्या संचालक मंडळात एकही महिला नाही, हे लज्जास्पद असल्याची टीका केली होती.

त्यानंतर, २०२३ पर्यंत कार्यकारी मंडळासह पहिल्य पाच कार्यकारी स्तरावर महिलांचे प्रमाण ४० टक्क्यांवर नेण्याचे झलांडोने ठरवले आहे. रिटर हे निवृत्त होत असल्याने त्यांच्या पदावर महिलेची नियुक्ती करून झलांडोला आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची योग्य संधी आली आहे, असं ऑल ब्राईटचे कार्यकारी अध्यक्ष विबेक आंकर्सन यांनी म्हटले आहे.