पोटापाण्यासाठी, कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी ११ वर्षांची परवाना मुलांचा वेश परिधान करून अफगाणिस्तानच्या रस्त्यावर वावरत होती. पकडलं जाऊ याची भीती तिच्या मनात सारखी असायची पण शेवटी प्रश्न पोटाचा होता म्हणून वाट्टेल ती जोखीम घेण्याची तिची तयारी होती. खूप वर्षांपूर्वी आलेल्या ‘ब्रेडविनर’ या कादंबरीमधल्या या अफगाणी मुलीची गोष्ट सिताराच्या रुपात जगासमोर आली आहे.

अखेर राणीचं चोरीला गेलेलं सोन्याचं हृदय सापडलं!

विटभट्टीत काम करणाऱ्या सिताराला पाहताक्षणी ती मुलगी आहे यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मुलांसारखी ती समाजात वावरत असली तरी ती मुलगी आहे. सिताराला पाच बहिणी आहेत. घरात वंशाचा दिवा मात्र नाही. त्यामुळे कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी सितारा मुलांसारखा वेश परिधान करते. ज्या कुटुंबात वंशाचा दिवा नाही त्या घरातील मुलींचा ‘बाचा पोशी’ हा विधी होतो. त्यानुसार त्या मुलांसारखे कपडे परिधान करू शकतात किंवा रोटी कमावण्यासाठी घराबाहेर पडू शकतात. मासिक पाळी येईपर्यंत मुलींना मुलासारखा वेश परिधान करुन वावरण्याची परवानगी असते असं एएफपीनं म्हटलं आहे.

‘ध’चा ‘मा’ झाला, अन् डॉक्टरांनी डोक्याऐवजी पायाची सर्जरी केली!

सितारा वफादार अफगाणी मुलांसाराखा पोशाख करते. मुलांसारखे आखूड केस ठेवते. तिच्या बोलण्यातही पुरुषी ढब जाणवते. सिताराची आई आजारी असते. तिच्या उपचारांचा सर्व खर्च सितारा आणि तिच्या वडिलांच्या खांद्यावर आहे. ती दिवसाला भारतीय मूल्याप्रमाणे साधरण शंभर रुपयांच्या आसपास कमावते. ‘मी नेहमीच स्वत:ला मुलागा मानायचे, वयाच्या आठव्या वर्षांपासून मी कुटुंबासाठी रोटी कामावत आहे, नियतीनं माझ्यापुढे काहीच पर्याय ठेवला नाही. ‘ असं सितारा म्हणते. अफगाण समाजात मुलीनं घराबाहेर पडून काम करणं मान्य नाही. त्यामुळे घरचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी ती मुलगी असूनही आई बाबांसाठी मुलांसारखं आयुष्य जगत आहे.