11 December 2017

News Flash

Viral Video : लिपस्टिक आणि आयशॅडो लावलेल्या शोएब अख्तरला पाहून हसू अनावर

'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तरचा मेकअप फसला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 2:06 PM

(छाया सौजन्य - द लिक पेज)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अनेकदा चर्चेत असतो. सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असलेल्या शोएबला नेहमीच लाइम लाइटमध्ये राहायला आवडतं. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखला जाणारा शोएब आता जणू सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. २०११ मध्येच क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली. त्यानंतर आत्मचरित्राचे प्रकाशन, फेसबुकवरच्या पोस्ट, कॉमेडी शोमध्ये परीक्षक अशा वेगवेगळ्या कारणाने शोएब चर्चेत आला होता. पण आता आणखी एका वेगळ्याच कारणाने शोएब चर्चेत आलाय. तसं टीव्हीवर दिसण्यासाठी नेहमीची प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. तेव्हा चांगले कपडे घालणं किंवा मेकअप करणं यासाख्या गोष्टी ओघाने आल्याच. पण शोएबने मात्र या कार्यक्रमासाठी एवढा मेकअप केला की ते पाहून अनेकांना हसू अनावर झालाय.

VIRAL : भाऊ एकटाच नडला, पण वाघासारखा भिडला!

‘जिओ टीव्ही’च्या एका कार्यक्रमासाठी शोएब मुलाखत देत होता. त्यावेळी शोएबने चक्क महिलांसारखा मेकअप केला होता. त्याने लावलेली लिपस्टिक आणि आयशॅडो इतकं उठून दिसत होतं की सोशल मीडियावर त्याला पाहून अनेकांना हसू अनावर होत होतं. ‘मान्य आहे की टीव्हीवर दिसायचं असेल तर सेलिब्रिटींना मेकअप करणं गरजेच आहे. त्याशिवाय ते सुंदर कसे दिसणार म्हणा, पण त्यासाठी एवढाही मेकअप करू नये की ज्यामुळे आपण विदुषक वाटू’ अशा शब्दात शोएबची खिल्ली उडवली जात आहे.

First Published on June 19, 2017 2:06 pm

Web Title: the former pakistani cricketer shoaib akhtar terrible make up