News Flash

आता तुम्हीही बनू शकता ‘अभिनंदन’, एअरफोर्सनं लाँच केला अॅक्शन गेम

मिग-21पासून सुखोई, मिराज, एमआय-17 सारखी लढाऊ विमाने तुम्ही उडवू शकतात.

भारतीय हवाई दलामध्ये (IAF) करियर करणासाठी तरूणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुधवारी व्हिडिओ गेम लाँच करण्यात आला आहे. ‘Indian Air Force: A Cut Above’ असे या व्हिडीओ गेमचं नाव आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते या खास फ्लाइट सिम्युलेटर गेमचे आनावरण करण्यात आले.

विशेष म्हणजे, या व्हिडीओ गेममध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचे पात्र दिसणार आहे. त्याशिवाय मिग-21पासून सुखोई, मिराज, एमआय-17 सारखी लढाऊ विमाने तुम्ही उडवू शकतात. बालाकोट एअर स्ट्राइकची झलकही व्हिडीओ गेममध्ये दिसणार आहे. भारतीय वायू सैन्याने केलेली ऐतिहासिक कामगिरी व्हिडीओ गेमच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. वायूसेनाने आपल्या ऑफिशअल ट्विटर खात्यावर गेल्या आठवड्यात टीझर जारी करत या व्हिडीओ गेमची माहिती दिली होती.

इथं करा व्हिडीओ गेम डाऊनलोड –
https://play.google.com/store/apps/details?id=com.threye.iaf.aca

हा व्हिडीओ गेम सिंगल प्‍लेअर मोबाइल गेम(फक्त एकच व्यक्ती खेळू शकतो) आहे. अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मोबाइल व्हर्जनमध्ये गेम खेळता येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत या व्हिडीओ गेमचं मल्‍टीप्‍लेअर व्हर्जन येण्याची शक्यता आहे. ‘Indian Air Force: A Cut Above’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्यांना खराखुरा पायलट असल्याचा रोमांचक अनुभव मिळेल असा दावा भारतीय वायू सेनेने केला आहे.

इतर फ्लाइट सिम्युलेटर गेमप्रमाणेच हा गेम खेळणाऱ्यांना पहिल्यांदा ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्यानंतरच खेळाडूला लढाऊ विमान उडवण्याची संधी मिळणार आहे. या गेममध्ये विविध लढाऊ विमाने आणि अनेक मिशनचा समावेश आहे. सर्व मिशन पार करणाऱ्या खेळाडूला भारतीय हवाई दलाकडून खास भेट मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:51 pm

Web Title: the indian air force now has a mobile game watch the teaser of indian air force a cut above nck 90
Next Stories
1 अमेरिका मेक्सिको बॉर्डरवर ‘सी-सॉ’ डिप्लोमसी
2 डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द , भन्नाट उत्तर देऊन Zomatoने जिंकली नेटकऱ्यांची मनं
3 दुबई: पंतप्रधानांच्या सहाव्या पत्नीने लंडन कोर्टात मागितले संरक्षण
Just Now!
X