News Flash

Video : तिचा सुरेल आवाज ऐकून जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या डोळ्यातही आलं पाणी

भारतीय वंशाची मुलगी अमेरिकन आयडलमध्ये

अलिशा आपल्या वडिलांसोबत राहते.

पंधरा वर्षांची अलिशा रघुनंदन ही भारतीय वंशाची मुलगी सध्या जगप्रसिद्ध पॉपस्टार केटी पेरीच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. अलिशा अमेरिकन आयडलमध्ये ऑडिशनसाठी गेली होती. यावेळी तिच्या आवाजाची जादू केटीवर इतकी चढली की अलिशाचं गाणं संपल्यावर तिच्या डोळ्याच्या पापण्याही ओलावल्या. अर्थात अलिशानं इतरही परीक्षकांची मनं आपल्या सुरेल आवाजानं जिंकत अमेरिकन आयडलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.

अलिशा आपल्या वडिलांसोबत राहते. तिच्या पालकांचा घटस्पोट झाला. त्यानंतर तिचा सांभाळ वडिलच करू लागले. तिला गायक व्हायचं आहे आणि यात वडिल आपल्याला खूप साथ देतात. ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात असंही ती परीक्षकांना सांगत होती. अलिशानं ऑडिशनमध्ये Is Never Enough ‘इज नेव्हर इनफ’ हे गाणं गायलं. तिचं गाणं संपल्यानंतर तिघंही परीक्षक भारावून तिच्याकडे पाहत होते. केटीच्या डोळ्यात तर अश्रूही आले होते. तिचं गाणं ऐकून केटी इतकी प्रभावीत झाली की अमेरिकन आयडलच्या अंतिम दहा स्पर्धकांमध्ये ती सहज पोहोचू शकते असं कौतुक करत तिच्या सुरेल आवाजाची पोचपावती केटीनं दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 6:38 pm

Web Title: the indian origin girl win katy perry heart on american idol show
Next Stories
1 धक्कादायक ! रुग्णवाहिका नसल्याने मुलांनी रिक्षा ढकलत नेला वडिलांचा मृतदेह
2 ४८ वर्षे सोबत राहील्यानंतर त्यांनी नातवंडांसमोर केले लग्न
3 ‘घरवापसी’ करणाऱ्या स्टिव्ह स्मिथसाठी एअर न्यूझीलंडची विशेष ऑफर
Just Now!
X