ऑटोमोबाईल इण्डस्ट्रीमध्ये  जपानच्या लैक्सस कंपनीने नवा आविष्कार आणला आहे. ही गाडी माणसांच्या लहरीप्रमाणे रंग बदलणार आहे म्हणे. या कंपनीने नुकतेच आपले एक मॉडेल जगासमोर आणले आहे. तब्बल ४१ हजार ९९९ एलईडी लाईट्स लावून ही गाडी बनवण्यात आली असून ही गाडी माणसांच्या लहरीप्रमाणे रंग बदलणार असल्याचा दावा कंपनीनी केला आहे.

वाचा : तुम्हाला सतत मोबाईल व्हायब्रेट होण्याचा भास होतो का?

लैक्ससने बनवलेल्या या आधुनिक गाडीमध्ये तीन मोड आहे. त्यातला एका मोडवर गाडी ठेवताच, वेगवेगळ्या ग्राफिक्समध्ये तिचे रुपांतर होणार आहे. तर म्युझिक मोडवर जाताच ग्राडीच्या ग्राफिक्समध्ये आणखी वेगळे बदल पाहायला मिळणार आहेत. तर तिस-या मोडवर गाडी जाताच चालक आपल्या मर्जीप्रमाणे गाडीवरील ग्राफिक्समध्ये बदल घडवून आणू शकणार आहे. त्यामुळे अशी अनोखी गाडी आपल्याकडे असावी असे वाटले नाही तर नवलच म्हणावे लागेल. सध्या तरी ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध होणार की नाही याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. तसेच या गाडीची किंमतही गोपनीय ठेवण्यात आली आहे. त्यामुळेही ही गाडी कधी येते आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.

याचा एक व्हिडिओ ही कंपनीने युट्युबवर अपलोड केला आहे. यात गाडीचे रंग कसे बदलात हे दाखवण्यात आले आहे. या गाडीवर हाताने एलईडी ब्लब लावण्यात आल्याची चर्चा आहे. या गाडीवर एकून ४२ हजार एलईडी ब्लब लावण्याचा कंपनीचा मानस होता पण टेक्निशिअनने चुकून एक ब्लब खिशातच ठेवला त्यामुळे या गाडीवर ४१ हजार ९९९ एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत.