News Flash

याला म्हणतात परवडणारी गाडी, एका चार्जिंगमध्ये ७२५ किमी धावणार

ही कार एका चार्जमध्ये तब्बल ७२५ किमी धावू शकते. इतके जास्त अंतर कापणारी ही जगातील पहिली कार आहे.

पाच सीटर असलेल्या या कारमध्ये पाच चौरसमीटरच्या सोलर बॅटऱ्या बसवण्यात आल्या आहेत.

वाहनांमध्ये वापरले जाणारे इंधन दिवसेंदिवस महाग आणि कमी होत चालले आहे. या इंधन समस्येवर अद्याप सक्षम असा पर्याय पुढे आलेला नाही. सौरउर्जेवर चालणारी वाहने ही संकल्पना गेल्या काही काळात मूळ धरत होती. मात्र, वाहनांवर बसवलेले मोठमोठे सौरनियंत्रक पाहिल्यावर ही कल्पना प्रत्यक्षात येणे कठीण असल्याच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या, दरम्यान लाईटईअर कंपनीच्या सोलर कारने हे चित्र पूर्णपणे पालटण्याचा प्रयत्न केला आहे. सोलर कार लाईट ईयर वन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारचे हॉलंडमध्ये प्रदर्शन करण्यात आले. “कोणताही अडथळा न करणाऱ्या सौरनियंत्रकांच्या सहाय्याने ही गाडी धावते. या सौरनियंत्रकांमुळे जवळपास ७५ टक्के प्रवास हा सौरउर्जेवर करणे शक्य आहे. शिवाय ही कार एका चार्जमध्ये तब्बल ७२५ किमी धावू शकते. सौरउर्जेवर इतके जास्त अंतर कापणारी ही जगातील पहिली कार आहे” असा दावा या कारबाबत लाईटईअर कंपनीने केला आहे.

पाच सीटर असलेल्या या कारमध्ये पाच चौरसमीटरच्या सोलर बॅटऱ्या बसवण्यात आल्या आहेत. ही कार जेव्हा उन्हात चालवली जाते तेव्हा या बॅटऱ्या आपोआप चार्ज होतात. शिवाय या कारला घरातील विजेवर देखील चार्ज करता येते. चार्ज करण्यासाठी केवळ २३० व्होल्टचा प्लग पुरेसा आहे असा दावा कंपनीने केला आहे. २०२१ पासून ही कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनी एकूण ५०० गाड्या तयार केल्या असून त्यातील १०० गाड्यांचे बुकिंग देखील झाले असल्याचे सांगितले जात आहे. या कारची किंमत १,३५,००० पौंड म्हणजे ९४ लाख रुपये आहे. आगाऊ नोंदणीसाठी सुमारे तीन चतुर्थांश रक्कम भरावी लागणार आहे.

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत – 

  • कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन ही प्रक्रिया नसल्यामुळे ही वाहने शून्य प्रदूषण करतात.
  •  इंधन सर्वत्र विनामूल्य उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष वाहन चालवण्याचा खर्च कमी असतो.
  •  सोलर सेल कार्यरत असताना कोणत्याही प्रकारचा आवाज करत नाहीत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटरही फारसा आवाज करत नसल्यामुळे या वाहनांचा एकूण आवाज कमी असतो.
  • या वाहनांचा मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो.

सोलर कारचे काही तोटे पुढीलप्रमाणे आहेत – 

  •  सद्य:स्थितीमध्ये या वाहनांची किंमत खूप जास्त आहे. याचे मूळ कारण हे सोलर सेलचा निर्मिती खर्च जास्त असणे हे आहे. तसेच या वाहनाच्या सुटय़ा भागांचे उत्पादन व्यावसायिक तत्त्वावर सुरू झालेले नसल्यामुळे ते महाग आहेत.
  • बऱ्याच उदाहरणांमध्ये दिसून आल्याप्रमाणे काही वेळा सोलर सेलने तयार केलेली विद्युत ऊर्जा वाहन चालवण्यासाठी अपुरी पडते; यामुळे वाहनाची आसनक्षमता मर्यादित राहते. तसेच तयार केलेली ऊर्जा साठवण्यातही अनेक अडचणी असल्यामुळे या वाहनांची एकूण अंतर कापण्याची क्षमता कमी असते.
  •  सोलर सेलची कार्यक्षमता (थर्मल एफिशियन्सी) ही साधारणपणे १५ टक्के एवढीच आहे. याचा अर्थ एकूण मिळालेल्या ऊर्जेच्या फक्त १५ टक्के ऊर्जा ही वापरासाठी उपयुक्त अशा विद्युत ऊर्जेत रूपांतरीत करण्यात येते. ही कार्यक्षमता सध्या प्रचलित असलेल्या पेट्रोल व डिझेल इंजिनापेक्षा निम्म्याहून कमी आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत सौर ऊर्जावर चालणारी वाहने ही प्रामुख्याने शर्यतींमध्ये भाग घेण्यासाठी बनवण्यात येत असत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:36 pm

Web Title: the lightyear one solar car electric car mpg 94
Next Stories
1 ‘नोटाबंदीनंतर फसलेला सर्वात मोठा प्रयोग म्हणजे विजय शंकर’, चाहते संतापले
2 फिरकीविरुद्ध संथ फलंदाजी, सेहवागने धोनीवर साधला निशाणा?
3 VIDEO: तुंबलेले रस्ते, स्टेशनवरील ‘धबधबे’; पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व तयारी गेली वाहून
Just Now!
X