जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर करोनाच्या संकटाला धीराने तोंड देताना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास या कर्मचाऱ्यांना पीपीईमध्ये (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) राहूनच रुग्णांवर उपचार करत आहेत. याचाच एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ट्विटर पोस्ट केला आहे. दोन डॉक्टरांचा पीपीई किट घालून बॉलिवूड गाण्यावर नाचताना व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

जम्मू काश्मिरमधील डोडा जिल्ह्याती दुर्गम डोंगराळ प्रदेशात घरोघरी जाऊन लसीकरण केल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाल्याचे पाहून आनंद झाला,” असे जितेंद्र सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात ‘काश्मा चश्मा’ या बॉलिवूड गाण्यावर आरोग्य कर्मचारी नाचताना दिसत आहेत. १९ जून रोजी सकाळी वाजता जितेंद्र सिंह यांनी व्हिडिओ पोस्ट केलेले ८ हजारपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये, प्रत्येकास लवकरात लवकर लसी मिळावी यासाठी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य कर्मचारी घरोघरी लसीकरण या योजनेसाठी कठीण असे डोंगराळ प्रदेश आणि नद्या ओलांडून गावांमध्ये जात आहेत.

Viral Video: मुंबईतील महिला डॉक्टर PPE कीटमध्येच ‘हाय गर्मी’वर थिरकली; वरुण धवनही कमेंट करुन म्हणाला…

भारतीय सैन्यदेखील केंद्र शासित प्रदेश प्रशासनाशी मदत करत आहे. “जे लोक लसीकरण करण्यासाठी शहरात येऊ शकत नाहीत त्यांना कोविडवरील लस देण्यासाठी आम्ही नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ जात आहोत. हा परिसर डोंगराळ आहे, म्हणून आम्ही येथे लसीकरण करण्यासाठी जात आहोत, विशेषत: वृद्ध आणि अपंग असलेले लोक लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाही” असे लष्करातील डॉक्टर कॅप्टन सादिक अरमान यांनी एएनआयला सांगितले.

याआधी देखील कामाच्या तणावतून बाहेर पडण्यासाठी एका डॉक्टरचा पीपीई किट घालून नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये एका डॉक्टरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. पीपीई किट घालून ही डॉक्टर तरुणी गर्मी या वरुण धवनच्या गाण्यावर नाचत असल्याचं या व्हिडीओत दिसलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa (@dr.richa.negi)

करोनायोद्धे असणारे डॉक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून हसत हसत रुग्ण सेवा करत असून त्यांना सलाम करण्यासाठी मुंबईमधील रिचा नेगी या महिला डॉक्टरचेन पुढाकार घेतला होता. “जरी आम्ही स्वत: या गर्मी होणाऱ्या मात्र तितक्याच सुंदर दिसणाऱ्या पोशाखामध्ये असतो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही या वाढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये थोडं सकारात्मक राहणं गरजेचं आहे,” असं रिचाने म्हटले होते. डॉक्टर्स डे आणि १ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये महिनाभरासाठी वाढलेल्या लॉकडाउनची सांगड घालत रिचाने सर्व सामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असं आवाहन केलं होतं.