आजवर आपण सगळ्यांनीच जेम्स बाँडचे अनेक चित्रपट पाहिले असतील. अवघ्या जगाला या चित्रपटांची भुरळ पडली आहे. हा एक सिक्रेट ब्रिटिश एजंट असतो… आणि त्याच्या एजन्सीसाठी तो काम करत असतो. मात्र खरंच जेम्स बाँड होऊन गेलाय.. त्याचं सिक्रेट नावही 007 असंच होतं असं सांगितलं तर? हो ही बाब खरी आहे. जेम्स बाँड या नावाचा एक सिक्रेट एजंट १९६० च्या दशकात होऊन गेला आहे. हा ब्रिटिश सिक्रेट एजंट होता आणि पोलंडमधली माहिती काढण्यासाठी पोलंडला गेला होता. पोलंडच्या दस्तावेजात याचे पुरावे सापडले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पोलंडमध्ये त्या काळात शीतयुद्ध सुरु होतं. या शीतयुद्धाच्या काळात हा एजंट पोलंडमध्ये येऊन गेला होता. विशेष बाब म्हणजे त्याचं सिक्रेट नाव 007 असंच होतं.

इन्स्टिट्युट ऑफ नॅशनल रिमेंब्रन्सने (IPN) जेम्स बाँड संदर्भातली माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. IPN ने दिलेल्या माहितीनुसार, जेम्स बाँड हा खासगी गुप्तहेर १८ फेब्रुवारी १९६४ ला पोलंडमध्ये आला होता. त्याला पोलंडमधल्या ब्रिटिश एम्बसीमध्ये नोकरी लागल्याने तो आला होता. मात्र त्याचा मुख्य उद्देश हेरगिरी हाच होता. दरम्यान पोलंडमधल्या गुप्तचर विभागाच्या रडारवर तो आला होता. “आमच्या देशातील गुप्तचर यंत्रणेला माहित होते की जेम्स बाँड हा हेर १९६४ ते १९६५ या कालावधीत पोलंडमध्ये आला होता.” अशी माहिती मारझेना क्रक यांनी रॉयटर्सला दिली आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

मारझेना क्रक या IPN च्या ऐतिहासिक दस्तावेज विभागाच्या संचालक आहेत. त्याने पोलंडमध्ये वर्षभराचा कालावधी घालवला. त्याला बायका आवडत असत. एवढंच नाही तर पोलंडमधली बिअरही त्याला आवडत असे अशीही माहिती क्रक यांनी दिली. पोलंडमधील गुप्तचर यंत्रणांना जेव्हा  त्याच्याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. जेम्स बाँड आमच्या देशातील नागरिकांच्या संपर्कात आला नव्हता. मात्र पडद्यामागून तो आमच्या विरोधात कारवाया करत होता. असंही क्रक यांनी स्पष्ट केलं आहे. १९६५ मध्ये त्याने देश सोडला. त्याने मागे सोडलेले काही दस्तावेज हाच त्याच्याबाबतचा एक पुरावा होता असंही त्यांनी सांगितलं आहे.