04 August 2020

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेलं चित्र पाहिलंत का?

चित्राचा होणार लिलाव

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रेखाटलेलं सर्वात दुर्मिळ चित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काही चित्रकार नाहीत किंवा चित्र कलेशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंधही नाही पण कोणे एकेकाळी त्यांनी काढलेल्या चित्राला लाखोंची बोली लागण्याची शक्यता आहे. २००५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक चित्र काढलं होतं. न्यूयॉर्क शहरातील गगनचुंबी इमारती त्यांनी कागदावर रेखाटल्या होत्या. यात त्यांनी ट्रम्प टॉवर रेखाटला होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी त्यांनी हे चित्र काढलं होतं. आता हे चित्र लिलावासाठी ठेवण्यात आलंय. गुरूवारी संध्याकाळपासून यासाठीचा लिलाव सुरू होईल, जो शुक्रवारी पाहेटपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

वाचा : ट्रम्प यांच्या त्या वाक्यानं फ्रान्सच्या फर्स्ट लेडीही झाल्या खजील!

सुरूवातीची बोली सहा लाखांपासून सुरू होईल. ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रेखाटलेलं सर्वात दुर्मिळ चित्र’ अशी ओळ या चित्राला देण्यात आलीय. एका वेबसाईटच्या माहितीनुसार या चित्राच्या खाली ट्रम्प यांची सोनेरी अक्षरातील स्वाक्षरी देखील आहे.

Viral Video : पोलंडच्या फर्स्ट लेडीने ट्रम्प यांचा केला पचका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 1:58 pm

Web Title: the new york skyline drawing by donald trump is going up for auction
टॅग Donald Trump
Next Stories
1 Viral Video : चोर आहे की भूत? 
2 सशांच्या डोक्यालिटीला मानलं बुवा!
3 बहीण डोळ्यादेखत मरत असताना ती मात्र व्हिडिओ लाइव्ह करत होती
Just Now!
X