शाही घराण्याची नवी सून मेगन मार्केल हिचा सर्वात आवडता पदार्थ शाही कुटुंबाच्या स्वयंपाक घरातून हद्दपार करण्यात आला आहे. शाही राजघराण्यातील सदस्यानं कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही यासाठी खास नियम तयार करण्यात आले आहेत हे नियम सुरक्षेच्या कारणासाठी पाळणं प्रत्येक कुटुंबासाठी बंधनकारक आहे.

डॅरेन मॅकग्रॅडी हे शाही कुटुंबाचे शेफ आहेत. त्यांनी ‘इटिंग रॉयली’ हे पुस्तकदेखील लिहलं आहे. गेल्या पंधरावर्षांपासून शाही कुटुंबातील सदस्यांसाठी स्वयंपाक करण्याचं काम ते करतात त्यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. पास्ता हा मेगनचा सर्वात आवडता पदार्थ आहे. मात्र राणीला तो आवडत नाही. तसेच स्टार्च असलेले पदार्थ आहारातून वगळण्यास राणींनी सांगितलं आहे. त्यामुळे हा पदार्थ शाही कुटुंबाच्या मेन्यूमधून हद्दपार करण्यात आला आहे असं ते म्हणाले.

आहारात सकस आहाराचा समावेश असावा यासाठी राणी आग्रही आहे त्यामुळे बरेचदा जेवणात शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो अशीही माहिती त्यांनी दिली.