News Flash

‘द रॉक’ लढवणार २०२०ची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक?

सोशल मीडियावर रॉकची चर्चा सुरू आहे

द रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन हा २०२० ची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवणडूक लढवणार असल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

डब्ल्यूडब्ल्यूईचा सर्वात परिचयाचा चेहरा असलेला द रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन हा २०२० ची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवणडूक लढवणार असल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. खुद्द रॉकनेही ही शक्यता नाकरली नाही. ‘ऐसशोबिज डॉट कॉम’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार २०२० ची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक रॉक लढवू शकतो.

नुकतीच अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि यात अगदी अनपेक्षित यश मिळवून डोनाल्ड ट्रम्प विजयी ठरले होते. त्यांच्या या अनपेक्षित यशाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात अनेकांनी निर्दषने केली. ९ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी २०२० च्या निवडणूक लढवावी असे आवाहनही नेटीझन्सने केले. मिशेल ओबामांनी निवडणुक लढवून अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळवून द्यावी अशी विनंतीही ट्रम्प विरोधकांनी केली. ही शर्यत सुरू व्हायला २०२० ची वाट पाहवी लागणार असली तरी रॉकने आपलेही नाव या यादीत पक्के करायचे ठरवले आहे.

WWE मुळे रॉक प्रसिद्ध असला तरी तो उत्तम अभिनेता देखील आहे. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. १९८० मध्ये रोनाल्ड रिगन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. राजकारणात पाऊल रोवण्याआधी ते चित्रपटसृष्टीत नट म्हणूनही प्रसिद्ध होते कदाचित त्यांच्याकडूनच या शर्यतीत उभे राहण्याची प्रेरणा रॉकला मिळाली असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 7:48 pm

Web Title: the rock for president in 2020
Next Stories
1 व्हायरल झालेला हा फोटो भाजप नेत्याच्या मुलीचा नव्हे
2 ‘या’ देशात सैन्यच नाही
3 ‘ही’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं !
Just Now!
X