17 July 2019

News Flash

जाणून घ्या हिरेजडित विमानाचं सत्य

विमानतळावर उभ्या असलेल्या या हिरेजडित विमानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

विमानतळावर उभ्या असलेल्या या विमानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

आलिशान विमानसेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एमिरेट्स एयरलाइन्सच्या एका हिरेजडित विमानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विमानकंपनीनं विमानावर हिरे जडवून घेतले असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. विमानतळावर उभ्या असलेल्या या विमानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. एमिरेट्सनं स्वत: या विमानाचा फोटो ट्विट केला आहे. मात्र हे विमान प्रत्यक्षात हिरेजडित नसून त्यामागचं सत्य वेगळं आहे.

एमिरेट्नं ट्विटरवर शेअर केलेला फोटो हा खऱ्या विमानाचा नसून तो एडिट केलेला आहे. आर्टिस्ट सारा शकिलनं हा एडिट केला आहे. आपली कल्पनाशक्ती वापरून तिनं विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाला फोटोएडिटींद्वारे हिरेजडित विमानाचं रुप दिलं. तिनं आपल्या इन्स्टाग्रावर शेअर केलेला विमानाचा फोटो एमिरेट्सला इतका आवडला की त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया साइटवर तो शेअर केला. इतकंच नाही तर हा फोटो तयार करणाऱ्या साराला एमिरेट्नं एक भेटही दिली आहे. काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार सारा ही व्हिज्युअल आर्टिस्ट आहे तिला पाकिस्तान ते मिलान अशी एकदिवसाची विमानसेवा कंपनीनं  भेट म्हणूनही दिली आहे.

First Published on December 7, 2018 12:01 pm

Web Title: the story behind viral photo of the diamond studded emirates plane