News Flash

VIDEO : बैलाचा महिलेवर हल्ला, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

टक्कर बसताच महिला काही फुटांवर जाऊन पडली

सोशल मीडियावर दोन दिवसांपासून एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. रस्त्यावर चालणाऱ्या एका बैलानं महिलेला मागून धडक दिली आहे. यात ही महिला काही फूट उंच उडून रस्त्याच्या कडेला पडली आहे. हा सगळा धडकी भरवणारा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून फेसबुक, व्हॉट्स अॅप सारख्या असंख्य ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बैलाच्या हल्ल्यात ही महिला जबरदस्त जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला असून तो गुजरातमधला असल्याचं समजत आहे. रस्त्याच्या कडेला ही महिला चालत असताना मागून येऊन या बैलानं तिच्यावर हल्ला केला. धडक बसताच ही महिला हवेत उडून काही फूट अंतर दूर पडली. महिलेला धडक देताच हा बैल सहज तिथून निघून गेला. हा भयानक प्रकार पाहून पादचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडला. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:36 pm

Web Title: the terrifying moment when a bull tossed a woman into air
Next Stories
1 तेलुगू देसम पक्षाचे खासदार साडी नेसून पोहोचले संसदेत
2 BLOG – ट्रॉफी जिंकलो कार्तिकमुळे, चर्चा मात्र कोहली, धोनीचीच!
3 फळ्यावर ‘MS Word’चे धडे देणाऱ्या शिक्षकाला भारतीय कंपनीकडून खास भेट
Just Now!
X