Prayagraj Kumbh Mela 2019 : कुंभमेळा म्हणजे गर्दीचा महापूर असतो. लाखो भाविक येथे उपस्थिती दर्शवतात. प्रयगराजमध्ये अर्ध कुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. लाखो भाविकांनी येथे उपस्थिती दर्शवली आहे. येथेल हजारो फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. यामध्ये इस्रोनेही प्रयागराज कुंभचे काही फोटो पोस्ट केले आहेत. उपग्रहातून हा अर्धकुंभ कसा दिसतो? याचा जरा विचार केल्यास आपल्याला डोळ्यांसमोर फक्त अंधार येत असेल.. खाली दिलेलल्या फोटोवर एक नजर टाका म्हणजे तुम्हाला उपगृहातून कुंभ कसा दिसतो हे समजेल…रिपोर्टनुसार, इस्रोतून भारतीय रिमोट सेंसिंग सॅटेलाइट कार्टोसॅट-२ मधून हे फोटो घेतलो आहेत. गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटरवर इस्रोने हे फोटो पोस्ट केले आहेत.

भारतातील कुंभमेळा जगभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.  रिपोर्टनुसार, मकरसंक्रातीच्या दिवशी दोन कोटींपेक्षा आधिक भाविकांनी कुंभमेळाव्यात हजेरी लावत गंगा नदीमध्ये स्नान केले होते. रिपोर्टनुसार, प्रयागराज कुंभमेळ्याला ४ हजार २३६ कोटी रूपये सरकारने खर्च केले हे. यामध्ये अर्धा खर्च राज्य सरकार तर अर्धा खर्च केंद्र सरकारने केला आहे.