आठवड्याचा दुसराच दिवस आणि सकाळीच अंधेरी इथं रेल्वे रुळावर गोखले पूलाचा भाग कोसळल्याची बातमी आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. एकीकडे धो-धो पाऊस, पूलाचा भाग कोसळल्याची बातमी आणि दुसरीकडे ऑफीस गाठायचं तरी कसं हा मुंबईकरांना पडलेला प्रश्न.. या विवंचनेत मिळेल त्या मार्गाने काही मुंबईकरांनी कसंबसं घर गाठलं आणि काही ऑफीसला पोहोचले. यादरम्यान सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे #MumbaiRains हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होऊ लागला. सद्यस्थितीसोबतच ट्विटर, व्हॉट्स अॅपवर भन्नाट विनोदसुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत.

व्हायरल जोक्स आणि मीम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी महापालिकेलाही चिमटे काढले.

मुंबईकरांना पडलेला प्रश्न: सुट्टी मिळण्यासाठी नेमका किती पाऊस पडणं अपेक्षित आहे?

मुंबईकर पहिल्या पावसात आणि दुसऱ्या पावसात…

गुगल मॅपवर पाणी कुठे कुठे साचलंय याचाही पर्याय हवा..

कोणी वांद्रे इथं बोटीने जात असाल तर कृपया मला लिफ्ट द्या…

कारण प्रेम आंधळं असतं…