News Flash

VIRAL : लोकांना घाबरवून सोडणाऱ्या ‘त्या’ जीन्सचा फर्दाफाश

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

( छाया सौजन्य : Tom Grotting )

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट अगदी वा-यासारखी पसरते. आललेली बातमी किंवा फोटो अफवा आहे की खरी घटना आहे याची सत्यता पडताळून बघण्यापेक्षा ते फॉरवर्ड करणे आणि इतरांनाही घाबरवून सोडणे असे प्रकार येथे सर्रास होतात. मग नंतर मात्र त्याचे सत्य उघड झाले की आपले हसू होते ते वेगळेच. असे आपल्या बाबतीत अनेकदा होते. असाचा प्रँक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हिवाळ्याचे दिवस त्यातून सगळीकडे बर्फच बर्फ, वातावरणात एक प्रकारची उदासीनता आणि भयाणताही. भर दिवसाही रस्त्यात तुरळक गर्दी दिसते अशा वेळी कोणी गंमत म्हणून घाबरवायचा प्रयत्न केला तर भितीनी एखाद्याला कापरे भरले नाही तर नवलच!

viral : तिच्या तीन पायांचे रहस्य काय?

मिनेसोटा हे अमेरिकेच्या उत्तर भागातील राज्य. थंडीमुळे येथे बर्फाची चादर पसरली होती. पण येथे राहणा-या टॉम या तरुणाने लोकांना मुर्ख बनवण्यासाठी एक अजब शक्कल लढवली. जिथे जिथे बर्फ दिसेल तिथे त्यांनी जिन्स पँट उभ्या करून ठेवल्या. त्यांनी अशा प्रकारे जीन्स पँटची रचना केली की जणू एक अदृश्य व्यक्ती जीन्स परिधान करून तिथे उभा आहे असे कोणालाही वाटले. या जीन्स पाहून अनेक जण घाबरले. आता या जीन्स बर्फात उभ्या राहिल्या कशा असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर नंतर कधीतरी टॉमनेही याचे उत्तर देऊन लोकांकडून प्रशंसा मिळवली. गेल्या चार वर्षांपासून टॉम असे करत आहेत. जीन्स पाण्यात भिजवून मग बर्फात आणून त्या विशिष्ट प्रकरे उभ्या करून तो ठेवतो. त्यांची रचना तो अशा प्रकारे करतो की कोणीतरी अंगावर ती चढवली असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही आणि हिच रचना पाहून लोक घाबरतात.

Viral : ग्रंथालयात प्रवेश मिळवण्यासाठी चिनी विद्यार्थ्यांनी लावली पहाटेपासून रांग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:51 pm

Web Title: these prank photo of jeans goes viral on social media
Next Stories
1 viral : तिच्या तीन पायांचे रहस्य काय?
2 Viral : ग्रंथालयात प्रवेश मिळवण्यासाठी चिनी विद्यार्थ्यांनी लावली पहाटेपासून रांग
3 एक होते ‘पायोनिअर ट्री’
Just Now!
X