News Flash

..म्हणून HIV ग्रस्तांच्या रक्तानं रेखाटलं प्रिन्सेस डायनाचं चित्र

एचआयव्हीग्रस्तांच्या रक्तापासून चित्र रेखाटण्याचं नेमकं कारण काय असंही अनेकांनी त्याला विचारलं. यामागे एक प्रभावी संदेश दडला आहे.

या चित्रकारानं चक्क एचआयव्हीग्रस्तांच्या रक्तापासून डायना यांचं चित्र रेखाटलं आहे.

ब्रिटन राजघराण्यातील दिवंगत प्रिन्सेस डायना आजही सामान्य जनतेच्या हृदयात वसल्या आहेत. त्यांना सर्वसामान्य लोकांची राणी म्हणूनही ओळखलं जायचं. राजघराण्याचे नियम त्यांनी अनेकवेळा मोडले, शाही कुटुंबातील बड्या लोकांपेक्षा सामान्य लोकांमध्ये त्यांचं मन जास्त रमायचं. आतापर्यंत अनेकांनी पुस्तकं, लेख, कविता किंवा कलेच्या रुपात प्रिन्सेस डायना यांना मानवंदना वाहिली. मात्र एका चित्रकारानं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं डायना यांना वंदन केलं आहे.

या चित्रकारानं चक्क एचआयव्हीग्रस्तांच्या रक्तापासून डायना यांचं चित्र रेखाटलं आहे. कॉनॉ कोलिन्स असं या चित्रकाराचं नाव असून त्यांच्या रेखाचित्राची चर्चा सर्वाधिक आहे. एचआयव्हीग्रस्तांच्या रक्तापासून चित्र रेखाटण्याचं नेमकं कारण काय असंही अनेकांनी त्याला विचारलं. यामागे एक प्रभावी संदेश दडला आहे. एप्रिल १९८७ मध्ये प्रिन्सेस डायना यांनी पहिल्यांदा एका एचआयव्हीग्रस्त रुग्णाशी हस्तांदोलन केलं होतं. त्याकाळी आणि आजही या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपच वेगळा आहे. त्यांना वाळीत टाकलं जातं. या रोगाविषयी असणारं अज्ञान आणि भीती यामुळे एचआयव्हीग्रस्त रुग्णांना दुय्यम वागणूक दिली जायची. पण प्रिन्सेस डायना पुढे आल्या आणि पुढाकर घेत त्यांनी समजाला प्रभावी संदेश दिला.

हे धाडस त्याकाळी क्वचितच कोणी केलं असेल. त्यांनी दाखवलेल्या या हिंमतीचा आदर म्हणून मी असे चित्र रेखाटलं असल्याचं कॉनॉनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:55 pm

Web Title: this artist made princess dianas portrait using hiv blood
Next Stories
1 America’s Got Talent : अन् ती थोडक्यात वाचली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
2 बडे दिलवाला! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं हॉटेल कर्मचाऱ्यांना दिली १६ लाखांची टिप
3 जगप्रसिद्ध ‘बर्बरी’ ब्रँडनं जाळून टाकले तब्बल २५६ कोटींचे कपडे आणि अॅक्सेसरीज्
Just Now!
X